बुलढाणा : मागील काही वर्षांपूर्वीच्या मोठ्या निवडणुकीत लक्षणीय मते घेत अधूनमधून उलटफेर करणाऱ्या बहुजन समाज पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. यंदाच्या विधानसभा रणसंग्रामात या राष्ट्रीय पक्षाला अत्यल्प मतदान मिळाल्याने ही बाब अधोरेखित झाली. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने बसपची जागा घेतल्याचे आणि वंचितचे ‘राजकीय उपद्रवमूल्य’ कायम असल्याचे सिद्ध झाले.

मागील काही वर्षांपूर्वी उत्तर भारतापुरता मर्यादित असलेल्या बसपने बुलढाण्यासह विदर्भात प्रवेश केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मते घेत अनेक ठिकाणी उलटफेर केले होते. रिपब्लिकन पक्ष अनेक गटात विभाजित झाल्याने या पक्षाने ती राजकीय पोकळी भरून काढली होती. दिग्गज नेते कांशीराम आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दलचे आकर्षण, त्यांनी महापुरुषांच्या नावाने केलेले जिल्ह्याचे नामकरण, उभारलेली स्मारके, बाबासाहेब आंबेडकर यांची निशाणी असलेले हत्ती हे निवडणूक चिन्ह, यामुळे आंबेडकरी चळवळ बसपकडे आकर्षित झाली. परिणामी मोठ्या निवडणुकीत, क्वचित ठिकाणी महापालिका लढतीत बसपला चांगले मतदान मिळाले. मात्र, यानंतर पक्षाची घसरण सुरू झाली.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”

हेही वाचा – भरत गोगावले, प्रशांत ठाकूर आणि आदिती तटकरे यांना मंत्रीपदाची आशा

बसपने यंदा जिल्ह्यातील सिंदखेडराजा वगळता अन्य सहा मतदारसंघांत उमेदवार उतरवले. मात्र, पक्षाला जेमतेम ४५९७ मते मिळालीत. यावर कळस म्हणजे एकाही उमेदवाराला १ हजाराचाही आकडा गाठता आला नाही! चिखली मतदारसंघात पक्षाला सर्वाधिक म्हणजे ९७७ मते मिळाली. मलकापूर ७७६, बुलढाणा ६५१, मेहकर ७३९, खामगाव ६५४ आणि जळगाव जामोद मतदारसंघात ८०० मते मिळाली. अनेक अपक्षांना यापेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. यामुळे पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्वच संपुष्टात आले आहे.

वंचितचे अस्तित्व आणि ‘राजकीय उपद्रवमूल्य’देखील कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात पाऊण लाखापेक्षा जास्त मतदान घेणाऱ्या वंचितच्या उमेदवारांनी पाच मतदारसंघातील निकालात निर्णायक भूमिका पार पाडली. याचा फटका अप्रत्यक्षपणे का होईना आघाडीच्या उमेदवारांना बसला आहे. या सात उमेदवारांना ७८ हजार ५५८ मते मिळाली. चिखली मतदारसंघातील सिद्धेश्वर पवार (१३०८ मते), मेहकर डॉ. ऋतुजा पवार (२०५४) यांचा अपवाद वगळता अन्य पाच मतदारसंघात वंचितने चांगली मते घेत महाविकास आघाडीचे मतांचे समीकरण बिघडवून टाकले. बुलढाण्यात आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके जिल्ह्यात सर्वात कमी (८४१) मतांनी पराभूत झाल्या. येथे वंचितचे प्रशांत वाघोदे यांनी ७१४६ मते घेतली. निकालात हा निर्णायक घटक ठरला.

हेही वाचा – भाजप नेत्यांच्या निर्णयाला पाठिंबा; मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण, सरकार स्थापनेत अडसर नसल्याचा खुलासा

खामगावमध्ये वंचितचे देवराव हिवराळे यांनी २६ हजार ४८२ मते घेतली. याचा फटका काँग्रेसचे दिलीप सानंदा यांना बसला. भाजपचे आकाश फुंडकर यांच्याकडून त्यांना २५४७७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मलकापूरमध्ये वंचितचे डॉ. मोहम्मद जमिर यांनी ९३१६ मते घेत काँग्रेसच्या पराजयात मोठा वाटा उचलला. जळगावमध्ये वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांनी १७६४८ मते घेतल्याने काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या पराभवमध्ये भर पडली. सिंदखेडराजामध्ये वंचितच्या सविता मुंडे यांनी १६६५८ मते घेतल्याने तिरंगी लढतीत मोठा उलटफेर झाला. आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या अनपेक्षित पराभवाला त्यांनी मोठा हातभार लावला.

Story img Loader