बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अकरा आजी माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातील काही ज्येष्ठ आमदारांचे राजकीय भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. याशिवाय दोन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे, यामुळेही यंदाचा विधानसभा रणसंग्राम लक्षवेधी ठरणार आहे.

भाजपने चारही जागांवर आजी माजी आमदारांना मैदानात उतरविले असून कोणताही ‘प्रयोग’ करण्याचे टाळले. चिखलीमधून श्वेता महाले, खामगावमधून आकाश फुंडकर आणि जळगावमधून संजय कुटे या आमदारांना तर मलकापूरमधून माजी आमदार चैनसुख संचेती यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. यातील संजय कुटे हे २००४ पासून सलग आमदार असून माजी मंत्रीसुद्धा राहिले आहे. फुंडकर हे दोनदा तर महाले या मागील लढतीत प्रथमच निवडून आल्या आहेत. या तिघांसमोर काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिले आहे. संचेती हे १९९५ ते २०१४ पर्यंत सलग आमदार राहिले आहे. मागील लढतीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे ज्येष्ठत्व पाहता भावी राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी यंदाची लढत करो या मरो अशी ठरली आहे.

election
आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Applications of aspirants including MLAs from Bhosari and Maval constituencies during assembly elections 2024 Pune print news
पिंपरी : पहिल्याचदिवशी विद्यमान आमदारांसह प्रमुख पक्षांतील इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी गर्दी, ‘यांनी’ घेतले अर्ज
former MLA of Vidhan Parishad, Legislative Assembly,
विधान परिषदेच्या पाच माजी आमदारांना विधानसभेचे वेध, वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी सुरू
Rupali Chakankar
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना आमदारकीची संधी का मिळाली नाही? स्वतःच खुलासा करत म्हणाल्या…
Uddhav Thackeray and Eknath Shinde MLA Chief Ministership
सर्वांत कमी आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद !
Ralegaon, Vasant Purke, Ashok Uike
राळेगावमध्ये दोन माजी मंत्री समोरासमोर
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’

हेही वाचा – आमदार रत्नाकर गुट्टे यांची उमेदवारी महायुती ‘पुरस्कृत’, गंगाखेड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी

शिंगणेंची राजकीय अस्तित्वाची लढाई

सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे भवितव्य पणाला लागले आहे. १९९५ पासून मागील लढतीपर्यंत ते आमदार, राज्य आणि कॅबिनेट मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. २०१४ ची निवडणूक त्यांनी लढविली नसली तरी २०१९ मध्ये ते पुन्हा आमदार झाले. यंदा त्यांनी ऐनवेळी अजितदादा गटातून शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली. त्यामुळे अजितदादा आणि शिवसेना शिंदे गटाने ही जागा प्रतिष्ठेची बाब केली आहे. यामुळे त्यांच्या समोर राजकीय उत्तरार्धात कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

काँग्रेसची कसोटी

काँग्रेसची जिल्ह्यात पक्षाची पीछेहाट झाली आहे. मागील लढतीत राजेश एकडे (मलकापूर) यांच्या रुपाने केवळ एक जागा मिळाली. आता आमदार एकडेसमोर दुखावलेल्या संचेती यांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. तीन वेळा चिखलीचे आमदार राहिलेले जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्यासाठी यंदाची निवडणूक निर्णायक आहे. त्यांचे राजकीय वजन कमी होणार हे उघड आहे. २००९ पासून सलग तीनदा आमदार झालेले खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांना २०१४ मधे नवखे आकाश फुंडकर ( भाजप) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत मैदानात उतरण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे तब्बल १० वर्षांनंतर ‘कमबॅक’ करण्याचे कडवे आव्हान त्यांच्या समक्ष आहे. जळगावमधून पक्षाने स्वाती वाकेकर यांना सलग दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्या समक्ष आमदार संजय कुटे (भाजप) यांचे प्रबळ आव्हान आहे.

हेही वाचा – धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

दोन्ही सेनेसमोर आव्हाने

यंदा बुलढाणा आणि मेहकरमध्ये सेना विरुद्ध सेना अशी लढत रंगली आहे. लोकसभेतील पराभवामुळे ठाकरे गटासाठी विधानसभा अस्तित्वाची लढाई ठरली आहे. त्यामुळे त्यांनी निष्ठाऐवजी ‘निवडून येण्याची क्षमता’ या निकषावर उमेदवार दिले आहे. बुलढाण्यात जयश्री शेळके यांच्या समक्ष शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे तर मेहकरमध्ये मागील लढतीत आमदारकीची ‘हॅट ट्रिक’ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर यांचे सिद्धार्थ खरात (उबाठा) यांच्या समोर कडवे आव्हान आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जयश्री शेळके यांना विधानसभेची संधी मिळाली आहे. त्यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी ही लढत आहे.