मुंबई : दहावी आणि बारावीच्या परिक्षार्थींना बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रोखण्याची मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची मागणी मुस्लिम समाजाला लक्ष्य करणारी असून मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. तसेच सदर मागणी फेटाळण्यात यावी अशी विनंती शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लिमांसाठी बुरखा परिधान करणे एक उपासना आहे. संविधानाच्या उद्देशिकेत व्यक्तीला श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. परीक्षेच्या नियमांच्या नावाखाली शाळांमध्ये बुरखाबंदी करण्याची मंत्री राणे यांची मागणी धर्मात हस्तक्षेप करणारी आहे, असा आरोप आमदार शेख यांनी केला.

कॉपीमुक्तीच्या आडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा यामागे कुटील डाव दिसतो. मंत्री राणे यांची मागणी मान्य केल्यास शिक्षण क्षेत्रात ध्रुवीकरण वाढू शकते, अशी भीती आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी शाळांमध्ये परीक्षार्थींना बुरखाबंदीची मागणी केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burkha ban student exam dispute nitesh rane rais shaikh print politics news ssb