सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई : वसई, विरार, नालासोपारा या शहरांची वेस ओलांडत बोईसर, पालघरमध्ये पक्षाची पाळेमुळे रोवणारे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात अस्तित्व राखताना झुंजावे लागेल असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना धक्का बसला आहे. आपल्या घरच्या मतदारसंघातही पाटील यांना पिछाडीवर जावे लागले.
पाटील यांची झालेली पीछेहाट लक्षात घेता यंदा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून ठाकूर आणि पाटील या दोघांपुढील विधानसभेचे तगडे आव्हान यामुळे उभे राहीले आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघाचा अर्धा भाग हा वसई-विरारमध्ये तर अर्धा भाग पालघर जिल्ह्यात येतो. या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संध्या २५ टक्के इतकी आहे. बोईसर हा औद्योगिक पट्टा आहे. मनोर, तारापूर हा मुस्लीम बहुल भाग आहे.
मविआ, महायुतीपुढेही आव्हान
या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असली तरी महायुतीलाही ही निवडणूक सोपी नाही. या भागात असलेला उत्तर भारतीय मतदार हा भाजपची जमेची बाजू असला तरी पालघरच्या ग्रामीण पट्ट्यातील उद्धव सेनेची ताकद ही महाविकास आघाडीसाठी उत्साह वाढविणारी बाब आहे.
हेही वाचा >>> सत्ताधाऱ्यांचाच गदारोळ; आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प
बंडखोरी पथ्यावर
बहुजन विकास आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेले राजेश पाटील २०१९ च्या निवडणुकीत बोईसर मतदारसंघातून रिंगणात होते. तेव्हा युतीमधील शिवसेनेच्या विलास तरे यांचे आव्हान होते. त्यावेळी भाजपातर्फे उमेदवारी मिळाली नसल्याने संतोष जनाठे यांनी येथून बंडखोरी केली होती. ही बंडखोरी बविआच्या पथ्यावर पडली होती. त्यामुळे राजेश पाटील यांचा अवघ्या २ हजार ७५२ मतांनी विजय झाला होता.
ठाकरे गटाचे आव्हान
गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार विलास तरे हे येथून भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे डॉ विश्वास वळवी यांनी मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला चांगली मते मिळाली. पालघरच्या ग्रामीण भागात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी आणि बविआ यांच्यातील मतविभागणीचा फायदा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. बदलेली ही राजकीय समीकरणे राजेश पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक आहेत.बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व राखताना झुंजावे लागेल असे चित्र आहे. महायुतीमुळे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असेल.