दिगंबर शिंदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सांगली : विधानसभेचे रणमैदान अद्याप कोसो दूर असतानाच जतमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडू लागल्या आहेत. जत कारखान्याचे खासगीकरण कुणामुळे झाले असा सवाल करीत काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी माजी आमदार विलासराज जगताप यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, तर जगताप यांनी आमदार केवळ टक्केेवारीत गुंग असून तालुययाच्या विकासाचे त्यांना काहीच देणेघेणे नसल्याचा जाहीर आरोप करून आगामी निवडणुक सोपी नसणार याची चुणूक दाखवली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जत मतदार संघातून आपल्या गटाला संधी मिळते का याची चाचपणी सुरू केल्याने रंगतदार निवडणुकीची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
जत तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असलेले काँग्रेसचे आमदार सावंत हे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे नातेवाईक आहेत. यामुळे जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर त्यांना कदम गटाचेच आमदार म्हणून ओळख मिळाली आहे. याला शह देण्याचा प्रयत्न आणि कदम गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रवादीकडून सातत्याने होत असतात. जत नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता असली विरोधकाचीच भूमिका बजावली जात असल्याने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम भाजपच्या मदतीने सुरू असते.
हेही वाचा… बच्चू कडू, रवी राणा यांचे भवितव्य काय ?
गतवर्षी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आ. सावंत यांचा पराभव झाला. सत्ताधारी पॅनेलमध्ये असूनही आ. सावंत यांचा झालेला पराभवाची खंत राष्ट्रवादीला कधी वाटली नाही. या उलट राष्ट्रवादीचे प्रकाश जमदाडे भाजप प्रणित पॅनेलमधून निवडून आले. तत्पुर्वी मागील निवडणुकीमध्ये आ. सावंत यांनी माजी आमदार जगताप यांचे पुत्र मनोज जगताप यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा यावेळी जगताप यांनी काढून परतफेड केली आहे. जतमध्ये काँग्रेस-भाजप संघर्षाला केवळ पक्षिय संघर्ष असे स्वरूप नसून कदम आणि जगताप यांच्या वैयक्तिक संघर्षाचे स्वरूप आहे. यातूनच एकमेकावर आरोपांची राळ उडवली जात आहे.
हेही वाचा… ‘महाविजय’ साठी वयोवृद्धांना साद घालत भाजपचे ‘अमृतकुंभ अभियान’
काही दिवसापुर्वी आमदारांच्या संपत्तीची सक्तवसुली संचलानालयामार्फत म्हणजेच ईडी चौकशीची मागणी जगताप यांनी केली होती. यातून जगताप यांची जतमध्ये हॉटेल, पेट्रोल पंप कसे उभारले गेले असा सवाल आ. सावंत यांनी करीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतानाच जगताप याचे शिलेदार माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांना जिल्हा बँकेत काम करण्याची संधीही मिळवून दिली. यातून हा राजकीय संघर्ष अधिक टोकदार बनत चालला आहे.
हेही वाचा… उजनीचा ‘गाळ’ राष्ट्रवादीसाठी ‘काळ’?
जत साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असताना त्याची विकी झाली. जत कारखाना इस्लामपूरच्या राजारामबापू साखर कारखान्याने घेतला. आता या कारखान्याची चौथी शाखा म्हणून हा कारखाना चालविला जात आहे. कारखाना विकला गेला त्यावेळी जगताप यांची सत्ता होती. यामुळे या खरेदी विक्री व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित करून जगताप यांनाच शह देण्याचा आमदारांचा हेतू होता. मात्र, खासगी साखर कारखाने जतमध्ये कसे उभे राहत आहेत असा सवाल करून प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा… माकप आणि किसान सभेची ताकद अबाधित
राजकीय आघाडी असतानाही राष्ट्रवादी वेळोवेळी भाजपच्या मदतीला धावून जात असल्याचे चित्र असले तरी भाजपमध्येही सगळे काही सुस्थितीत आहे असे नाही. कारण२०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्यामुळेच भाजपचा जतमध्ये पराभव झाल्याचा आरोप जगताप यांनी केला होता. त्यामुळे भाजपही तालुक्यात एकसंघ आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आ . सावंत यांचे बगलबच्चे नातलग हेच ठेकेदार असून ते केवळ टक्केवारीचेच आमदार असल्याने त्यांना विकास कामाचे काही देणेघेणे नसल्याचा गंभीर आरोप नुकताच जगताप यांनी केला असल्याने राजकीय धुळवड रंगली आहे.
जतच्या पूर्व भागात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोडा रवि पाटील यांनीही राजकीय बस्तान चांगले बसविले आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने भाजपमध्येही गटबाजीची चिन्हे आहेत. यावर काँग्रेसचे लक्ष केंद्रित असणार आहे. रवि पाटील यांनी जाडरबोबलाद, सोन्याळ, माडग्याळ, व्हसपेठ, या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावासह सीमावर्ती भागातील ४०गावांमध्ये राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. भाजपच्या माध्यमातून काँग्रेसलाच आव्हान देण्याबरोबरच पक्षांतर्गतही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, यामुळे भाजप-काँग्रेसच्या राजकीय साठमारीत याचाही विचार करावा लागणार आहे.