Lok Sabha Election 2024 भाजपाला तिसर्‍यांदा बहुमताने निवडून येण्याची आशा आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळेल का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाचा सर्वांत मोठा विजय झाला होता. भाजपाला आघाडीच्या ३०३ जागांपैकी ५० टक्के मतांसह २२४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत या निकालाची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले होते. यंदा इतका मोठा विजय मिळविणे भाजपासाठी शक्य आहे का? २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळाल्या होत्या? त्यावर एक नजर टाकू या.

गेल्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी

२०१९ मध्ये जिंकलेल्या २२४ जागांपैकी भाजपाला सात जागांवर ७० टक्क्यांपेक्षा जास्त, ७७ जागांवर ६० टक्के व ७० टक्के, तसेच १४० जागांवर ५० टक्के व ६० टक्क्यांदरम्यान मते मिळाली होती. गुजरातच्या सुरतमध्ये सर्वाधिक मतांची नोंद झाली होती. तिथे दर्शना जरदोश यांना ७४.४७ टक्के मते मिळाली होती. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर आणि इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने यावेळी सुरतची जागा भाजपाने बिनविरोध जिंकली आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी आघाडीवर

गेल्या निवडणुकीत भाजपाने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या जागांमध्ये हिंदू भाषिक प्रदेशांचा समावेश होता; जिथे आजही पक्ष प्रबळ आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकलेल्या ४० टक्के जागा उत्तर प्रदेशातील होत्या; ज्यात ८० मतदारसंघांचा समावेश होता. गुजरातमध्ये भाजपाने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांसह सर्व २६ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीतही भाजपाने ५० टक्के मतांसह सर्व सात जागा जिंकल्या. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश यांसारख्या इतर राज्यांमध्येही भाजपाने प्रत्येक जागेवर ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळविला.

राजस्थानमध्ये भाजपाने राज्यातील २५ पैकी २३ जागा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकल्या होत्या. हरियाणामध्येही पक्षाने १० जागांवर विजय मिळविला होता. २९ पैकी २८ जागा जिंकलेल्या मध्य प्रदेशात आणि २८ पैकी २५ जागांवर विजय मिळविलेल्या कर्नाटकातही भाजपाला ५० टक्यांहून अधिक मते मिळाली होती. निम्म्याहून अधिक मतांसह जागा जिंकलेल्या इतर राज्यांमध्ये झारखंड (एकूण १४ पैकी आठ जागा), छत्तीसगड (११ पैकी सहा), आसाम (१४ पैकी सात), गोवा (दोनपैकी एक), त्रिपुरा (दोनपैकी एक), जम्मू व काश्मीर (पाचपैकी दोन), बिहार (४० पैकी १४), महाराष्ट्र (४८ पैकी १५), पश्चिम बंगाल (४२ पैकी पाच) व पंजाब (१३ पैकी एक) यांचा समावेश आहे.

भाजपाच्या मित्रपक्षांसह इतर पक्षांनी मिळून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांसह ११७ जागा जिंकल्या. त्यापैकी द्रमुक (१९ जागा), काँग्रेस (१८), वायएसआरसीपी (१३), जेडीयू (११) व शिवसेना (१०) अशा सर्वाधिक जागा मिळविणारे पक्ष होते.

हेही वाचा : Lok Sabha Election Result 2024: वाराणसी ते वायनाड, देशातील लक्षवेधी लढती

विरोधी पक्षांच्या मतांची आकडेवारी

गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी मिळून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांसह ५४ जागा जिंकल्या आणि इतर असंघटित पक्षांनी अशा ४२ जागा जिंकल्या. सर्व पक्षांमध्ये अशा १८६ जागा होत्या जिथे विजयी फरक जागेच्या एकूण मतांच्या १० टक्क्यांपेक्षा कमी होता. त्यापैकी ९७ जागांवर विजयाचे अंतर पाच टक्क्यांपेक्षा कमी होते.

गेल्या वेळी भाजपाने १० टक्क्यांपेक्षा कमी मतांसह ८३ जागा जिंकल्या. या जागांमधील ४१ जागांवर विजयाचे अंतर एकूण मतांच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होते. १० टक्क्यांपेक्षा कमी मतांच्या फरकाने सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या इतर पक्षांमध्ये काँग्रेस (३१ जागा), टीएमसी (११), वायएसआरपी (९), बीजेडी (७) व बसप (६) यांचा समावेश होता.