Sharad Pawar NCP : जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आमदार, खासदार आणि पदाधिकारी शरद पवारांच्याबरोबर राहिले. इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्हही तात्पुरत्या स्वरूपात अजित पवार यांच्या पारड्यात टाकले.

इतके सर्व घडल्यानंतरही मे-जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने लढवलेल्या १० जागांपैकी ८ जागा जिंकत मोठे यश मिळवले. मात्र, शरद पवार यांचे हे यश सहा महिनेही टिकू शकले नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला लढलेल्या ८७ पैकी अवघ्या १० जागांवरच विजय संपादीत करता आला. भारतीय राजकारणातील ग्रँडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार यांना आता पुतणे अजित पवार यांनी चितपट केले आहे. ते आधी त्यांचे बहुसंख्य आमदार आणि खासदार घेऊन गेले, नंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह (यावर कायदेशीर लढा सुरू असला तरी) आणि आता त्यांनी मतदारांचे समर्थनही मिळवले आहे.

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Local Body Elections Maharashtra, Devendra Fadnavis Statement,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी? मुख्यमंत्री म्हणाले…

सिद्ध करण्यासाठी एकमेव संधी

दरम्यान महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले बहुमत पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुढील पाच वर्षांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एकमेव संधी मिळणार आहे. २०१४ ते २०१८ दरम्यान झालेल्या २७ महापालिकांच्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादीला ६.९५ टक्के मते मिळाली होती. परंतु निमशहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची मते अनुक्रमे १५ टक्के आणि २१ टक्के इतकी होती.

नव्या पिढीला तयार करण्याची रणनीती

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्यास दिवशी शरद पवार आपेल राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या दर्शनासाठी कराडमध्ये त्यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. त्यावेळी निकालानंतर पहिल्यांदाच बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “मी शांत बसणारा नाही. लोकांना भेटत आणि त्यांचे प्रश्न सोडवत राहीन. माझ्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या नव्या पिढीला तयार करणे ही माझी रणनीती असणार आहे.”

शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सरचिटणीस जयदेव गायकवाड यांनी कबूल केले की, पक्षाला नजीकच्या भविष्यासाठी तसेच पुढे जाण्यासाठी रोडमॅपची आवश्यकता आहे. “शरद पवार यांच्या व पक्षाच्या भविष्याबाबत कोणी काहीही बोलले तरी, ते त्यांच्याविचारधारेसाठी लढतच राहतील”, असे गायकवाड पुढे म्हणाले.

आमदार-खासदारांना एकत्र ठेवण्यावर भर

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार १० आमदार आणि आठ खासदारांना एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडे ही संख्यात्मक ताकद आहे, तोपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे महत्त्व संपले असे म्हणता येणार नाही, असे एका सूत्राने सांगितले.

योगायोगाने, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी वयाचे कारण देत संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. पण, गंमत अशी आहे की, २०२६ मध्ये निवृत्त झाल्यावर पवारांना राज्यसभेवर परत पाठवण्यासाठी आमदारांच्या मतांचा कोटाही आता राष्ट्रवादीकडे (शरद पवार) असणार नाही.

एक पराभव म्हणजे महाविकास आघाडीचा अंत नाही

केवळ एका निवडणुकीने महाविकास आघाडीचा अंत होईल, असे भाकीत करणे चुकीचे ठरेल, असा प्रतिवाद प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. गाडगीळ यांनी मान्य केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बरेच काही अवलंबून आहे. मला आशा आहे की आम्ही आमची कामगिरी सुधारू.

Story img Loader