मेरिटच्या आधारावर उमेदवारी – बावनकुळे

भाजपच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर उमेदवार निश्चित केले आहे, ते सर्व निवडून येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपर येथे उमेदवारी यादी जाहीर केल्यावर दिली.

Candidacy by BJPs Central Parliamentary Board on the basis of Merit says Chandrasekhar Bawankule
भाजपने आज एकूण ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर बावनकुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला.(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : भाजपच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर उमेदवार निश्चित केले आहे, ते सर्व निवडून येतील, लवकरच दुसरी तिसरी यादी जाहीर होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपर येथे उमेदवारी यादी जाहीर केल्यावर दिली.

भाजपने आज एकूण ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, केंद्रीय सांसदीय मंडळाने उमेदवारी निश्चित केली आहे. सर्वांच्या सहमतीने ही नावे निश्चित करण्यात आली आहे. ती करताना मेरिट पाहण्यात आले आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांना निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यामुळे पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे, असे बावनकुळे म्हणाले. खुद्द बावनकुळे कामठीतून लढणार आहे. हे येथे उल्लेखनीय.

आणखी वाचा-पेणच्या उमेदवारीबाबत भाजपमध्ये संभ्रम

यादीत नावे नसलेल्या विद्यमान आमदारांबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, ज्या विद्यमान आमदारांची नावे यादीत नाही, त्याना वगळण्यात आले आहे, असे नाही, लवकरच केंद्रीय सांसदीय मंडळ दुसरी व तिसरी यादी जाहीर करणार आहे. त्यात काहींचे नावे असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी लढत आहोत. त्यामुळे रविवारी जाहीर झालेल्या उ मेदवारांच्या यादीतील सर्व उमेदवार जिंकतील, असा आम्हाला विश्वास आहे. असे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीची यादी अद्याप जाहीर झाली नाही, ती जाहीर झाल्यावर आमची यादी येऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाचे वारे

शनिवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती व त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याच वेळी भाजपची यादी जाहीर होणार यांचे संकेत मिळाले होते. त्यानुसार रविवारी दुपारी यादी जाहीर करण्यात आली. यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे तर काही काही विद्यमान आमदारांची नावे यादीत नाही, त्यात नागपूर जिल्ह्यातील मध्य नागपूरचा समावेश आहे. रामटेकमध्ये विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांची उमेदवारी सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती. मात्र शिवसेनेची (शिंदे) अधिकृत यादी अद्याप जाहीर झाली नाही. शिवसेनेने उमरेडची जागाही भाजपकडे मागितली आहे. उमरेडचे माजी आमदार राजू पारवे हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यांनी रामटेकमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती व त्यात ते पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Candidacy by bjps central parliamentary board on the basis of merit says chandrasekhar bawankule print politics news mrj

First published on: 20-10-2024 at 20:20 IST
Show comments