गुजरातमधील अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रोहन गुप्ता यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. वडिलांची नाजूक प्रकृती पाहता निवडणुकीतून माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गुप्ता हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. काँग्रेसने १२ मार्च रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. गुप्ता यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आली होती. या यादीत गुजरातमधील सात उमेदवारांची नावे होती. खरं तर काँग्रेस पक्षासाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण पक्षाने बराच विचारविनिमय करून आणि इतर सर्व वाद बाजूला ठेवून त्यांची निवड केली होती. आता त्यांच्या जागी दुसरा उमेदवार मिळणे पक्षाला कठीण जाणार आहे. त्यांना दोन वर्षांपूर्वी सोशल मीडिया टीमच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळच्या व्यक्तीशी त्यांच्या कुटुंबाचे संबंध जगजाहीर झाले होते. १२ मार्च रोजी काँग्रेसने त्यांच्या नावाची घोषणा केल्यापासून सर्व काही आनंदात चालले होते. परंतु पक्षाला भूतकाळाचा विसर पडताना दिसत होता. माघार घेण्यापूर्वी गुप्ता यांनी बापूनगरमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेसाठी बुधवार निश्चित केला होता. २३ मार्च रोजी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यांच्या मोहिमेला धार देण्यासाठी १०० सदस्यांची टीम तयार करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा