वर्धा : . वर्धा वगळता जिल्ह्यातील तीनही ही मतदारसंघात प्रामुख्याने ग्रामीण भाग येतो. वर्धा मतदारसंघ पण सेलू व नजीकच्या भागात ग्रामीण भागात मोडतो. मात्र उमेदवार येतात तेव्हा गावात शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र आहे. केवळ मोजके पक्षीय कार्यकर्ते माहिती असल्याने गोळा होतात. चिंतेत पडलेला उमेदवार मग म्हणतो की बोलवा गावाकऱ्यांना. तेव्हा एकच सूर उमटतो. गावात कोण नाय, सगळे शेतात. मग भाषण कुणापुढे देणार, अशा चिंतेत उमेदवार पुढे निघतो. हे चित्र ग्रामीण भागात सरसकट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस जिल्हाध्यक्ष व वायफड  येथील  शेतकरी मनोज चांदुरकर म्हणतात. पक्षाचे काम असल्याने गाव सोडावे लागते. पण त्यामुळे या हंगामातील कामे मागे पडणार, असे ते म्हणतात. चणा, गहू पेरणे सूरू आहे. त्यासाठी कठाणा  करण्याचे काम आहे. तूर, कापसाला पाणी देण्याचे काम असून काही शेतकरी कापूस वेचाईत  गुंतले असल्याने गाव सायंकाळ पर्यंत ओस पडले असते. गत विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक दीड महिना उशीरा होतहआहे. गतवेळी  याच हंगामात म्हणजे दसरा, नवरात्रात निवडणूक झाली होती. त्या काळात सोयाबीन पिक नुकतेच कापणीसाठी आलेले असते. १५ दिवस थोडा निवांत होता. म्हणून त्यावेळी गाव निवडणुकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> महायुती, महाविकास आघाडीत ‘गॅरंटी’ची स्पर्धा

आता तसा उत्साह दिसून येत नसल्याचे सांगितल्या जाते.मतदान टक्का यावेळी निश्चित घसरू शकतो, असे निरीक्षण शेतकरी संघटनेचे नेते व सोनेगावचे शेतकरी सतीश दाणी म्हणतात. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील मजूर येतात. चंद्रपूरचे आता धान पेरणीसाठी गावाला परत गेले आहे. मात्र शेतमजूर कामाला असले तरी ज्याची शेती तो पण कामावर लक्ष ठेवण्यासाठी गाव सोडू शकत नाही. म्हणून सायंकाळी थोडी बहुत वर्दळ दिसून येत असल्याने राजकीय गप्पा झडतात. पण शेती कामांचा परिणाम मतदानवर दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे दाणी सांगतात. पण पुढे कामे कामी होतील, तेव्हा राजकीय वातावरण दिसू शकते. आता सकाळी पाणी ओलायला गेलेला शेतकरी वीज पुरवठा असेपर्यंत घरी येतच नाही. म्हणून हे काम सूरू राहणारच असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा >>> Shirala Assembly Constituency : शिराळ्यात जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक

गाव पुढारी जेव्हा प्रचारासाठी विनंती करतो तेव्हा त्यास मुले शेतीवर चाललो, असे स्पष्ट उत्तर देऊन टाकतो.नेता गावात येतो तेव्हा  त्यांचे कार्यकर्तेच स्वागतपुरते असतात. इतर फिरकतही  नाही. असे थंड काम पाहून काहींनी युक्ती केली. गावात गाडी पाठवून फिरायला चला म्हटले की काही जमा होतात. तेवढाच प्रचार होत असल्याचे एका बड्या उमेदवाराने नमूद केले. एका पक्षाचा गाव पुढारी कामाला लागला की मग विरोधी पक्ष कार्यकर्त्यास पण जाग येते स्पर्धेतून मग शेतीकामे बाजूला सारून फिरण्याची हौस भागवून घेण्याचा पण प्रकार होत आहे. पण हे  कार्यकर्त्या पुरतेच. मतदार दूरच. अतिवृष्टीने अर्धे पीक गेले आणि उरल्या पिकास भाव नाही. त्यातच शेती कामे असल्याने प्रचारास प्रतिसाद नसल्याचे चित्र विदर्भात दिसून येत असल्याचे आघाडीचे नेते सांगतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates concern over voters low response in rural areas in wardha district for maharashtra assembly election 2024 print politics news zws