अकोला : अकोला पूर्व मतदारसंघात यावेळेस तिरंगी लढत होणार असून भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचे आव्हान राहणार आहेत. अकोला पूर्वतील तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर पडणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघात जातीय राजकारण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अकोला पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ पासून रणधीर सावरकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सलग तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मविआमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढत असून गोपाल दातकर यांना उमेदवारी दिली. वंचित आघाडीने ज्ञानेश्वर सुलताने यांना संधी दिली आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीत तिहेरी सामना होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांनी वंचित आघाडीचा २४ हजार ७२३ मतांनी पराभव केला होता. अकोला पूर्व मतदारसंघात जातीय राजकारण नेहमीच प्रभावी राहिले आहे. मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, धनगर, कोळी, दलित, मुस्लीम, तेली, बंजारा व इतर समाजाचे गठ्ठा मतदान आहे. भाजप उमेदवार मराठा पाटील, शिवसेनेचे कुणबी, तर वंचित आघाडीचे धनगर समाजाचे उमेदवार दिले असल्याने जातीनिहाय गठ्ठा मतांची विभागणी होण्याचा दाट अंदाज आहे. दलित, मुस्लिमांसह इतर छोट्या-मोठ्या समाजाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

akola shivsena
परंपरागत काँग्रेसच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा मोठा डाव; बाळापूर नितीन देशमुख, अकोला पूर्व दातकर, तर वाशीममधून डॉ.देवळेंना संधी; भाजपपुढे आव्हान
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Sanjay Kelkar Thane, Thane Shivsena support,
ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
CM eknath shinde constituency, Bharat Chavan,
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले
Abdul sattar
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते ठाकरे गटात
politely battle in 46 assembly constituencies in Marathwada
मराठवाड्यात पुन्हा एकदा ‘ जोडू या अतुट नाती’ चा खेळ
Uddhav Thackeray group, Buldhana Uddhav Thackeray news,
बुलढाण्यात यश मिळविण्यासाठी ठाकरे गट सक्रिय
Narendra Modi temple Pune, BJP party worker temple pune,
पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’

हेही वाचा – परभणी जिल्ह्यात मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली

रणधीर सावरकर यांची पक्षावर मजबूत पकड असून मतदारसंघात त्यांनी संघटनात्मकरित्या जाळे निर्माण केले. १० वर्षांतील विकास कामे व व्यापक जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो. शिवसेनेचे गोपाल दातकर व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांचे राजकारण जिल्हा परिषदेत राहिले. दोन्ही उमेदवारांच्या समाजाचे गठ्ठा मतदान लक्षात घेऊन पक्षांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. युतीमध्ये २०१४ च्या अगोदर शिवसेनाच तत्कालीन बोरगाव मंजू मतदारसंघात लढत होती. १९९५ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून गुलाबराव गावंडे निवडून आले होते. त्यानंतरच्या चार निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही. २०१४ मध्ये स्वबळावर लढली, त्यावेळी शिवसेना उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३५ हजार ५१४ मते मिळाली होती. आता दातकर यांच्यापुढे मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान राहील. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २००४ पासून या मतदारसंघात धनगर समाजाला कायम प्रतिनिधित्व दिले. यादरम्यान भारिप-बमसंचे हरिदास भदे २००४ व २००९ मध्ये निवडून देखील आले, तर २०१४ व २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता वंचितने ज्ञानेश्वर सुलतानेंना उमेदवारी दिली. त्यांच्यापुढे वंचितच्या मतपेढीत भर घालण्याचे लक्ष्य असेल. अकोला पूर्वच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

लोकसभेत काय होते चित्र?

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. भाजपचे अनुप धोत्रे यांना ८७ हजार ८११, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ६० हजार ३३४, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना ५० हजार ८७८ मते मिळाली होती. अकोला पूर्वमधून भाजपने २७ हजार ४७७ निर्णायक मताधिक्य मिळवले होते.

हेही वाचा – प्रताप चिखलीकरांचे पाचवे पक्षांतर !

शहरी भागावर भिस्त

अकोला पूर्व मतदारसंघात भौगोलिक दृष्ट्या शहरी आणि ग्रामीण भाग जोडल्या गेलेला आहे. अकोला पूर्वमध्ये शहरी भागाचा प्रभाव अधिक आहे. शहरी भागातील मतदारांवर प्रमुख तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची भिस्त राहील. शहरी मतदार कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकताे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.