CBI summons CM Arvind Kejriwal : देशपातळीवर भाजपाविरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जोरात सुरू असतानाच आता सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांची चौकशी होईल. याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना चौकशीची नोटीस मिळताच दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ट्वीट करत केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रीय जनता दल आणि शिवसेनेने केजरीवाल यांना मिळालेल्या नोटिशीवरून भाजपावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल हे गेल्या काही काळापासून विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीतील केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या नोटिशीवरून मोदी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने नोटीस देऊन मोठे काम केले आहे. माझी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी देशाच्या सर्व विरोधी पक्षांतील नेत्यांना गॅस चेम्बरमध्ये घालावे. नाझी पद्धतीने सर्वांना एकदाचे संपवून टाकावे. कुणीही मागे राहता कामा नये. हुकूमशाही पद्धतीने तुमचे काम चालू द्या.” झा पुढे म्हणाले की, आपल्या हातातून सत्ता निसटेल अशी भीती पंतप्रधानांना वाटत आहे. त्यामुळेच केंद्रीय यंत्रणांना फक्त विरोधी पक्षातील नेत्यांचीच घरे दिसत आहेत. विरोधी पक्षातील जे नेते त्यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. करत राहा. तुमचा शेवट जवळ आला आहे.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

हे वाचा >> अरविंद केजरीवाल राजकारणातले ‘नटवरलाल’, भ्रष्ट लालूप्रसाद यादव, राहुल गांधींवर भाजपा नेत्याची टीका

अदाणी समूहाच्या गैरव्यवहार प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपा सरकार विरोधी पक्षांतील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचाही आरोप मनोज कुमार झा यांनी केला. कधी काँग्रेस, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, आप, बीआरएस अशा विरोधी पक्षांतील नेत्यांवर आळीपाळीने कारवाई होत आहे. भाजपाने एकही विरोधी पक्ष सोडलेला नाही. तुमचा मित्र उघडा पडतोय, म्हणून तुम्ही घाबरले आहात का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा >> पंतप्रधान मोदी यांच्या पदवीची माहिती उघड का करता येत नाही? केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाने दंड का ठोठावला?

अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या नोटिशीवरून विरोधी पक्ष आवाज उठवत असतानाच काँग्रेस पक्षश्रेष्ठी मात्र शांत आहेत. उलट दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केजरीवाल यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेले अरविंद केजरीवाल आता मद्यविक्री घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरे जात आहेत. दिल्लीला घोटाळ्याची राजधानी बनविण्यासाठी अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा आब राखण्यासाठी केजरीवाल यांनी स्वतःहून राजीनामा देऊन सीबीआयच्या चौकशीला सामोरे जावे, अशी टीका चौधरी यांनी केली आहे.

अनिल चौधरी हे ‘आप’वर तुटून पडत असताना काँग्रेसच्या इतर राज्यांतील नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेतलेला आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले की, भाजपाने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून स्वतःचे राजकीय हिशेब चुकवू नये. तुम्हाला केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याचा कोणताही अधिकारी नाही.

तर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच विधानसभेत भाजपा सरकार आणि अदाणी समूह यांचे सहसंबंध उघड केले होते. त्याचा आणि सीबीआय नोटिशीचा काही संबंध तर नाही ना? सीबीआयची नोटीस ही फक्त विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केलेली एक खेळी आहे, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी राजा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या जनतेने निवडून दिले आहे. सीबीआय ज्या प्रकारे काम करत आहे, त्यामुळे नक्कीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मद्यविक्री परवाना प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुन्हा मुख्यमंत्र्यांना पाचारण करून काय हसील केले? असा सवाल डी राजा यांनी केला आहे.

Story img Loader