CBI summons CM Arvind Kejriwal : देशपातळीवर भाजपाविरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जोरात सुरू असतानाच आता सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्यांची चौकशी होईल. याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना चौकशीची नोटीस मिळताच दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ट्वीट करत केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रीय जनता दल आणि शिवसेनेने केजरीवाल यांना मिळालेल्या नोटिशीवरून भाजपावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल हे गेल्या काही काळापासून विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांमध्ये सामील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिल्लीतील केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा