केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच भाजपचे संस्कार झाले होते. वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते, खजिनदार होते व आई चंद्रकांता गोयल या आमदार होत्या. पियूष यांनीही तरुणपणापासूनच भाजपचे संघटनात्मक कार्य सुरु केले होते. गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले. गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार आतापर्यंत सांभाळलेला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. नवी दिल्लीत गेली अनेक वर्षे काम करीत असताना गोयल हे पक्षश्रेष्ठींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. गेली ३५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिनदार पदही सांभाळले आहे. राज्यसभेचे सभागृह नेेतेपद त्यांनी भूषविले आहे.

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या खासदारांचे देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन; म्हणाले…

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
Fraud with businessman, fake police officer, Nashik,
बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून व्यावसायिकाची फसवणूक
Kalyaninagar accident case State govt approves prosecution of Dr Ajay Tavere and Srihari Halnor
कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
Vadgaon Sherit Mahayuti was not the candidate for the assembly elections Sharad Pawar group Pune print news
‘इतिहास’ बदलणाऱ्या ‘ या ‘ मतदारसंघाचा ‘वर्तमान’ अस्वस्थ! वडगाव शेरीत महायुतीचा उमेदवार ठरेना; शरद पवार गटाकडून ‘थांबा आणि पाहा’ धोरण
The position taken by the Court and Chief Justice Dhananjay Chandrachud
घ्यायला हवी तिथे कणखर भूमिका घेतली नाही, यासाठी सरन्यायाधीशांना लक्षात ठेवायचे का?

मुंबईकर असलेल्या पियूष गोयल यांचा जन्म १३ जून १९६४ रोजी झाला. माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत शालेय शिक्षण घेतलेल्या गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षेत देशपातळीवर आणि मुंबईच्या विधी पदवी परीक्षेतही दुसरा क्रमांक मिळविला होता. गोयल यांनी सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे. गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नौकायन मंत्री होते.

हेही वाचा : ‘विकास पुरूष’ नितीन गडकरी यांची केंद्रीय मंत्रिपदाची हॅटट्रिक

भाजपने यंदाच्या निवडणुकीत राज्यसभा सदस्य असलेल्या अनेक मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. गोयल यांना भाजपसाठी सुरक्षित असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. मुंबईत महायुतीला फटका बसला तरी गोयल हे मतदारसंघातून सुमारे साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले.