केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर लहानपणापासूनच भाजपचे संस्कार झाले होते. वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे ज्येष्ठ नेते, खजिनदार होते व आई चंद्रकांता गोयल या आमदार होत्या. पियूष यांनीही तरुणपणापासूनच भाजपचे संघटनात्मक कार्य सुरु केले होते. गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले. गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार आतापर्यंत सांभाळलेला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. नवी दिल्लीत गेली अनेक वर्षे काम करीत असताना गोयल हे पक्षश्रेष्ठींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. गेली ३५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिनदार पदही सांभाळले आहे. राज्यसभेचे सभागृह नेेतेपद त्यांनी भूषविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा