राज्यसभेत गुरुवारी (२१ सप्टेंबर) महिला आरक्षणावर चर्चा होत असताना सर्वपक्षीय महिला खासदारांना सभापतींच्या खुर्चीवर बसण्याची आणि सभागृहाचे कामकाज चालविण्याची संधी देण्यात आली. कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत विधेयक सादर केल्यानंतर सकाळी चर्चा सुरू झाली. विधेयकावरील चर्चा ऐकण्यासाठी एका बाजूला प्रेक्षक गॅलरीमध्ये तुडुंब गर्दी झाली होती; तर दुसरीकडे सभापतींच्या खुर्चीवर विविध पक्षांतील महिलांना बसण्याची संधी देण्यात आली. महिला खासदार पी. टी. उषा, एस. फांगनोन कोन्याक (भाजपा), जया बच्चन (सपा), सरोज पांडे (भाजप), रजनी अशोकराव पाटील (काँग्रेस), फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), डोला सेन (तृणमूल काँग्रेस पक्ष), इंदू बाला गोस्वामी (भाजपा), कनिमोळी (द्रमुक), कविता पाटीदार (भाजपा), महुआ माजी (झारखंड मुक्ती मोर्चा), कल्पना सैनी (भाजपा) आणि सुलाता देव (बिजू जतना दल) यांनी सभापतींचे कामकाज पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा