मोहन अटाळकर

अमरावती : विधान परिषदेच्‍या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासह २३ उमेदवारांचे भवितव्‍य येत्‍या ३० जानेवारीला ठरणार असून स्‍वत:ची शक्तिस्‍थाने मजबूत करण्‍याचा प्रयत्‍न उमेदवारांनी चालवला आहे. ही जागा कायम राखण्‍याचे आव्‍हान भाजपसमोर आहे.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

निवडणुकीसाठी एकूण ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्‍यानंतर रिंगणातील ३३ उमेदवारांपैकी १० जणांनी माघार घेतल्‍याने एकूण २३ उमेदवारांमध्‍ये लढतीचे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. या निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा थेट लढतीचे चित्र असले, तरी अन्‍य उमेदवारांमध्‍ये होणाऱ्या मतविभागणीचा फायदा किंवा नुकसान कुणाला होऊ शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत. विविध संघटनांचे पाठबळ मिळवण्‍यासाठी उमेदवारांनी प्रयत्‍न चालवले आहेत.

हेही वाचा… नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा

धीरज लिंगाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे माजी जिल्‍हाप्रमुख होते. त्‍यांनी निवडणुकीआधी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केला. त्‍यांना राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, तसेच ठाकरे गटाचे सहकार्य कशा पद्धतीने मिळते याचे औत्‍सुक्‍य आहे. त्‍यांना बंडाचा सामना देखील करावा लागणार आहे. कॉंग्रेसच्‍या पदवीधर सेलचे अध्‍यक्ष श्‍याम प्रजापती यांनी उमेदवारी कायम ठेवून अडचणी वाढवल्‍या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार हेही रिंगणात आहेत.

हेही वाचा… बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्व ‘अवसरवादी’ पण उद्धव यांच्याबरोबरील युती धर्म सुधारणावादी; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

‘नुटा’ या संघटनेच्‍या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्‍बल तीन दशके या संघटनेचे अमरावती पदवीधर मतदार संघावर वर्चस्‍व होते. बारा वर्षांपुर्वी झालेल्‍या निवडणुकीत ‘नुटा’चे तत्‍कालीन अध्‍यक्ष प्रा. बी.टी. देशमुख यांना पराभव पत्‍करावा लागला. त्‍यानंतर व्‍यावसायिक संघटनांची शक्‍ती क्षीण झाल्‍याचे मानले जाऊ लागले, पण नुकत्‍याच झालेल्‍या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या सिनेटच्‍या निवडणुकीत ‘नुटा’ने वर्चस्‍व सिद्ध केले. भाजपशी संबंधित संघटनांच्‍या पिछेहाटीचे हे चित्र डॉ. रणजीत पाटील यांच्‍यासाठी अडचणीचे ठरले आहे. ‘नुटा’ या निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार की गेल्‍या निवडणुकीप्रमाणे तटस्‍थ राहणार, याची उत्‍कंठा आहे.

हेही वाचा… राज्यातील निवडणुकांचे भवितव्य मंगळवारी ठरणार ?

डॉ. रणजित पाटील यांना शिवसेनेच्‍या शिंदे गटासह इतर सहकारी पक्षांचा पाठिंबा आहे. सत्‍तारूढ आघाडीत सहभागी असलेल्‍या प्रहार आणि मेस्‍टाचे उमेदवार किरण चौधरी यांनी माघार घेतली असल्‍याने डॉ. पाटील यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तथापि भाजपचे बंडखोर शरद झांबरे यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे हे शिंदे गटासोबत आहेत, पण त्‍यांच्‍या शिक्षक आघाडीची भूमिका अद्याप ठरलेली नाही. येत्‍या दोन-तीन दिवसांत सहकाऱ्यांसोबत चर्चा करून शिक्षक आघाडीची भूमिका जाहीर केली जाईल, असे श्रीकांत देशपांडे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा… नगरमधील दोन राजकीय घडामोडी भाजपसाठी फायदेशीर

विज्‍युक्‍टा, विदर्भ माध्‍यमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समितीसह विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्‍या संघटनांच्‍या भूमिकेवर देखील निकाल अवलंबून राहणार आहे. एकूण २ लाख ६ हजार १७२ मतदार हे या २३ उमेदवारांचे भवितव्‍य ठरविणार आहेत.

Story img Loader