भाजपेतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीची (इंडिया) तिसरी बैठक गुरुवार-शुक्रवार मुंबईत होत आहे. केंद्र सरकार तसेच, भाजपशासित राज्य सरकारांकडून लोकप्रिय घोषणांची खैरात होऊ लागली असल्याने दोन दिवसांच्या या बैठकीमध्ये ‘इंडिया’समोर कार्यक्रम (अजेंडा) निश्चितीचे मोठे आव्हान असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका करण्याची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केलेली चूक टाळण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. त्यामुळे ‘इंडिया’च्या बैठकांमध्ये केंद्र सरकार व भाजपविरोधातील अजेंडा व त्याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागणार आहेत. ‘इंडिया’च्या पहिल्या दोन बैठकांमध्ये एकजुटीच्या प्रक्रियेवर अधिक भर देण्यात आला होता. मुंबईतील बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने भाजपविरोधातील लढाईला सुरुवात होऊ शकेल.

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

हेही वाचा – महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ; शिवराज सिंह चौहान यांना महिलांचा पाठिंबा का मिळतो?

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीआधी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याच्या घोषणेमुळे मतदारांचे लक्ष भाजपकडे वेधले गेले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मध्य प्रदेशसारख्या भाजप राज्यात सरकारी योजनेअंतर्गत महिला लाभार्थींना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली आहे. सिलिंडरच्या दरकपातीमधून विरोधकांकडून होणाऱ्या महागाईच्या आरोपांनाही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या ‘रेवडी संस्कृती’वर तीव्र टीका केली असली तरी, केंद्र वा राज्य सरकारांच्या तिजोरीवर बोजा पडेल अशा घोषणा केल्या जात आहेत. या घोषणांतील फोलपणा लोकांसमोर मांडण्याचे आव्हानही ‘इंडिया’तील घटक पक्षांवर असेल. महागाई, बेरोजगारी, केंद्र व राज्य सरकारांचा भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळे, राजकीय-उद्योग हितसंबंध, चीनची घुसखोरी असे अनेक विषय ‘इंडिया’च्या अजेंड्यावर आहेत. राज्या-राज्यानुसार या अजेंड्यामध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे. तामीळनाडूमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष ‘द्रमुक’ची सत्ता असून तिथे भ्रष्टाचारापेक्षा भाजपविरोधातील भाषिक मुद्दा अधिक प्रभावी ठरू शकेल. त्यामुळे अजेंड्यांचे राज्यनिहाय प्राधान्यक्रम निश्चित करून ‘इंडिया’तील नेत्यांच्या देशव्यापी दौऱ्यांची आखणी करावी लागणार आहे.

हेही वाचा – देशात लवकरच मुदतपूर्व निवडणूक? ममता बॅनर्जींनंतर आता नितीश कुमार यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी, विरोधकांची एकजूट लोकसभा निवडणुकीसाठी असून विधानसभा निवडणुकीत महाआघाडी शक्य नाही, असे विधान केल्यामुळे ‘इंडिया’तील विसंगती पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये ‘इंडिया’तील काँग्रेस, समाजवादी पक्ष व आम आदमी पक्ष हे तीनही घटक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हे पक्ष भाजपपेक्षा एकमेकांच्या विजयामध्ये अधिक अडथळे आणण्याचा धोका असून मुंबईतील बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढावा लागणार आहे.

या बैठकीमध्ये ‘इंडिया’च्या मानचिन्हाचे अनावरण, महाआघाडीचा संभाव्य अध्यक्ष वा समन्वयक तसेच, समन्वयक समिती आदी व्यवस्थापकीय मुद्द्यांवर निर्णय घेतले जातील. त्याद्वारे घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिक संवाद, समन्वय, सुनियोजन वाढू शकेल व काही नेत्यांच्या आक्रमक विधानांवरही नियंत्रण आणले जाऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader