नागपूर : बुलढाणा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्या माघारीसाठी दिल्ली ते गल्लीपासून प्रयत्न सुरू आहे. सिंदखेडराजात तर दोन सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांसमोर रिंगणात असून प्रसंगी ‘मैत्री पूर्ण लढती’ची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये तोडगा काढण्यासाठी मुंबईत हालचाली सुरू आहे. यावर कळस म्हणजे मोठ्या संख्येने मैदानात उतरलेल्या अपक्षांपैकी अडचणीचे ठरू शकणाऱ्या अपक्षांचीही मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महिन्याभरापासून गाजत असलेल्या सिंदखेडराजामधील तिढा नामांकनानंतर आणखी गुंतागुंतीचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांना मैदानात उतरविले. शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना ‘एबी फॉर्म’ दिला. दुसरीकडे भाजपा विधानसभा प्रमुख सुरज हनुमंते, अंकुर देशपांडे, सुनिल कायंदे या भाजपा नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून गुंतागुंत वाढविली आहे. महायुतीतील मित्रपक्ष पिरिपाचे भाई विजय गवई यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिंदखेड राजात महायुतीचेच बंडखोर अधिक असल्याचे चित्र आहे. त्यांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी भाजपचे जिल्ह्यातील नेते, स्थानिक पदाधिकारी यांनी जोरकस प्रयत्न सुरू केले. जिल्हाध्यक्ष आमदार संजय कुटे यांनीही प्रयत्न चालविले आहे. यामुळे यातील बहुतेक जण माघार घेतील असा विश्वास एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केला.

Ajit Pawar Vs Sharad Pawar Rajendra Shingne Join NCP
Rajendra Shingne : अजित पवारांना ऐन निवडणुकीत आणखी एक मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
ajit pawar, pawar family get together, diwali, baramati,
दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर अजित पवारांचे दोन शब्दांत उत्तर…
sharad pawar ajit pawar supreme court clock symbol
Supreme Court : ‘घड्याळ’ कोणाचं? शरद पवार की अजित पवार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले…
Congress Candidates List
Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!
mahayuti uddhav sharad nana Express photo by Sankhadeep Banerjee 2
Nana Patole : “मविआत ४-५ जागांवर मतभेद…”, नाना पटोले स्पष्टच बोलले; काँग्रेसच्या यादीबाबत म्हणाले…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुमच्या पक्षातील लोक सोडून चाललेत”, पत्रकारांच्या प्रश्नांवर अजित पवार म्हणाले, “मी ज्यांना…”

हेही वाचा – दिवाळी पहाटला राजकीय प्रचाराचे ‘फटाके’

अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी, २९ ऑक्टोबरला काही भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी घडाळ्याच्या तर काही कार्यकर्ते धनुष्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत सामील झाल्याचे मजेदार दृश्य दिसून आले. माजी आमदार शशिकांत खेडेकर मागे हटायला तयार नाही. अजितदादा गटाने तर शिवसेनेने आम्हाला अंधारात ठेवून उमेदवार दिल्याचा आरोप केला. शिंदे गटाला जिल्ह्यात बुलढाणा व मेहकर या जागा मिळाल्या, पण आमचे काय? असा अजितदादा गटाचा सवाल आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीतच यावर तोडगा निघू शकतो अशी शक्यता आहे. अजितदादानी, ‘४ नोव्हेंबरपर्यंत वाट पहा मग समजेल’ असे माध्यमांशी बोलताना सांगितले. या अटीतटीच्या स्थितीत ना जुळलेच तर मैत्रीपूर्ण लढतची वेळ येते काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप- सेनेचा अजब तिढा

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपा पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली आहे. पक्षाने तशी परवानगी न दिल्यास शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. ते सध्या मुंबईत तळ ठोकून आहे. शिंदे यांनी बुलढाण्यात अर्ज दाखल केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात अर्ज भरला. याद्वारे त्यांनी भाजपा उमेदवार श्वेता ताई महाले यांच्यापुढे अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत गायकवाड आणि शिंदे दोन्हीही तयार नसल्याने हा तिढा आता नागपूर आणि मुंबईपर्यंत गेला आहे.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वाधिक फटका

चिखलीत हिंदू राष्ट्र सेनेचे कट्टर कार्यकर्ते विजय पवार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील रिपाइं आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी एक चमू केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची मनधरणी करीत असल्याचे वृत्त आहे.

मुकुल वासनिकांची तंबी

काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक यांनी २९ ला जिल्ह्यात हजेरी लावली. त्यांनी मलकापूरमधील काँग्रेस बंडखोर हरीश रावळ यांना माघारीचे आदेश दिले. बुलढाणा येथेही वासनिकांनी काँग्रेसच्या नाराज इच्छुकांना आघाडीच्या जयश्री शेळके यांचे काम करण्याची ताकीद दिली आहे.