मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती : जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर भाजपने आता अमरावतीवर लक्ष केंद्रित केले असून स्थानिक नेतृत्वाला बळ देत आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचना सुरू केली आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राणा दाम्पत्याचे स्थान काय, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यातून केवळ एक जागा मिळाली होती. अमरावती महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळाली, पण जिल्हा परिषदेत विरोधी बाकांवर बसावे लागले. नगर परिषदांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले, पण विधानसभेच्या आठपैकी सात मतदार संघांमध्ये विजयाचा रथ अडला, हे शल्य बाळगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षसंघटनात्मक बांधणीसोबतच राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा… शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात

अमरावती जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समुदायाला आपल्याकडे वळविण्यासाठी मोर्शीचे माजी आमदार डॉ. अनिल बोंडे यांना थेट राज्यसभेवर संधी देण्यात आली, तर जिल्ह्यातील परंपरागत मतदारांना खुश ठेवण्यासाठी ब्राम्हण चेहरा म्हणून श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले. या दोन नेत्यांना बळ देऊन जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न राज्यात सत्तांतरापूर्वीच सुरू होते. आता सत्ताबदलानंतर भाजपच्या नेत्यांना स्फूरण चढले आहे. पण, त्यांच्यासमोर भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा मोठा अडसर आहे. राणा दाम्पत्याचे भाजपमध्ये कोणते स्थान आहे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : कोल्हापूरमध्ये गोकुळच्या सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये संघर्ष, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना भाजप पाठिंबा देईल की, त्यांना कमळ चिन्ह घ्यावे लागेल, याची उत्सुकताही आता ताणली गेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात अलीकडेच अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा मतदार संघात कमळ फुलणार, अशी घोषणा करून राणा दाम्पत्याला सूचक इशारा दिला. निवडणुकांना अवकाश असला, तरी राणा दाम्पत्याची वाटचाल त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षासोबत राहणार की त्यांना भाजपचा झेंडा हाती घ्यावा लागणार, ही चर्चा आतापासूनच रंगली आहे.

हेही वाचा… बंडखोर बांगरांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, संतोष टार्फेंचा शिवसेनेत प्रवेश

बडनेरा विधानसभा मतदार संघात भाजपमधील अनेक नेते निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यात श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचे नाव अग्रस्थानी आहे. आपला परीघ वाढविण्यासाठी निष्ठावान लोकांना संधी द्यायची की समर्थकांना मोठे करायचे याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आगामी काळात घ्यावा लागणार आहे. राणा दाम्पत्याच्या महत्वाकांक्षेने अनेक भाजप नेते नाराज असले, तरी त्यांना व्यक्त होण्याची अजूनपर्यंत संधी मिळालेली नाही. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्ष हा भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगून रवी राणांनी एक पाऊल पुढे टाकले असताना जागा वाटपावरून संघर्ष अटळ मानला जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.