चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने विजय संपादन केला असला. तरी निवडणूक त्यांच्यासाठी कठीण गेली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मतदारसंघाच्या निमिर्तीपासून पहिल्यांदाच ‘घड्याळ’ चिन्हावर लाखभर मते मिळाल्याने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी आगामी महापालिका निवडणूक जिंकणे सोपे राहणार नाही. हे पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते. मागील दहा वर्षांत सलग तीनवेळा विधानसभेला पराभव चाखावा लागल्याने राहुल कलाटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून चार निवडणुका झाल्या. राज्यातील सर्वात मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे. चिंचवड मतदारसंघात महापालिकेचे १३ प्रभाग येतात. एका प्रभागातून चार असे ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जातात. मागीलवेळी एकट्या भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. लक्ष्मण जगताप यांची मोठी ताकद, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि आदरयुक्त दरारा होता. त्यांच्याविरोधात जाण्याचे कोणी धाडस करत नव्हते. सुरुवातीपासून जगताप घराण्याचे चिंचवडवर वर्चस्व राहिले. पोटनिवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या. मात्र, तिरंगी लढत होवूनही मतांमध्ये १५ हजारांनी घट झाली.

Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा

हेही वाचा – नागपूरकरांची मते जिंकण्यासाठी भाजप काय जादू करणार ?

भाजपमध्ये सर्व आलबेल नव्हते. वरकरणी प्रचार दिसत होता. अनेक माजी नगरसेवक मनापासून काम करत नव्हते. सर्व यंत्रणा जगताप यांची होती. शेवटच्या टप्प्यात शहराध्यक्ष महेश लांडगे यांची यंत्रणा प्रचारात उतरली. त्यांनी घरोघरी जात चांगले काम केले. जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळेगुरवमध्ये भाजपला चांगली मते मिळाली. पण, संपूर्ण मतदारसंघात ज्या प्रमाणात मताधिक्य मिळायला पाहिजे होते, तेवढे मिळाले नाही. याचा नजीकच्या काळात होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. यापूर्वी भाजप चिंचवडचे सर्व निर्णय लक्ष्मण जगताप घेत होते. आता नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि चिंचवडचे भाजप प्रभारी असलेले त्यांचे दीर शंकर जगताप या दोघांमध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. त्यामुळे चिंचवड भाजपचे निर्णय कोण घेणार, यावरही पालिका निवडणुकीची बरिचे गणिते अवलंबून राहतील.

मागील निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात उभे राहण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेत नव्हती. तिघांनी उमेदवार दिले नाहीत. राष्ट्रवादीतील बहुतांश माजी नगरसेवक, पदाधिकारी जगताप यांच्या तालमीत तयार झाले. त्यामुळे जगताप यांच्या प्रस्थाची त्यांना जाण होती. परिणामी, जगताप यांच्यासमोर लढण्याचे कोणी धाडस करत नव्हते. घाबरत होते, वैर घेत नव्हते. तुल्यबळ जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी गर्भगळीत झाली होती. त्या आव्हानात्मक परिस्थिती जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे यांनी २०१९ मध्ये अपक्ष लढविण्याचे धाडस केले. तुल्यबळ लढत दिली.

हेही वाचा – बालेकिल्ल्यांमध्येच भाजपला पराभवांचे धक्के

जगताप नसल्याने पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मांदियाळी झाली. त्यातून नाना काटे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली. एक लाखापर्यंत मते मिळविण्यात राष्ट्रवादी पक्ष यशस्वी ठरला. तिरंगी लढतीतही घड्याळाला मिळालेली मते राष्ट्रवादीला दिलासा देणारी आहेत. राष्ट्रवादीची ही मते पाहता यापुढे चिंचवडची निवडणूक भाजपला एकतर्फी राहणार नाही हे स्पष्ट होते. यावेळी मतविभागणी आणि सहानुभूतीचा फायदा भाजपला झाला. पण, यापुढील निवडणुकीत भाजपला कष्ट करावे लागणार असे दिसते.

अजित पवार यांनी लक्ष घातल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अंग झाडून काम केले. लाखभर मिळालेल्या मतांमुळे राष्ट्रवादीला उभारी मिळाली असून महापालिकेतील सत्ता मिळण्यासाठी आशेची किरण झाला आहे. आत्मविश्वास वाढला आहे. मागीलवेळी महापालिकेतील गेलेली सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी अजित पवार आता चिंचवडमधील मतांचा बारकाईने अभ्यास करून कुठे कमी पडलो, याचा विचार करून पालिकेत उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढल्याने चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत काटे की टक्कर होईल.

हेही वाचा – कसब्याच्या निकालाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार

कोणतीही ठोस भूमिका न घेणारे राहुल कलाटे यांची पराभवाची हॅट्रिक झाली. मागीलवेळेच्या लाखभर मतांच्या जोरावर चिंचवडचे प्रबळ दावेदार राहिलेल्या कलाटे यांची पोटनिवडणुकीत अनामत रक्कमही जप्त झाली. मागील दहा वर्षांत कलाटे यांचा सलग तिसऱ्यांदा विधानसभेला पराभव झाला. दोन पंचवार्षिक आणि आताच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने मतदारांनी कलाटे यांना सपशेल नाकारल्याचे दिसते. ज्या वाकड प्रभागातून कलाटे महापालिकेवर निवडून आले होते. तिथे भाजपला मिळालेली मते त्यांच्यासाठी चिंताजनक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ती डोखेदुखी ठरविणारी आहेत. सलग तीनवेळेच्या पराभावमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे गटाने वगळले तर कलाटे यांच्यासमोर भाजप किंवा शिंदे गटाशिवाय पर्याय राहिला नाही. कलाटे यांचा पूर्वाश्रमीचा इतिहास पाहता भाजपवाले किती जवळ करतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कलाटे यांचे कोणाशीच सख्य कायम राहत नाही. निष्ठा बाळगत नाहीत. त्यामुळेच सर्वच पक्षांमध्ये कलाटे यांच्या निष्ठेविषयी संशय निर्माण केला जातो.

Story img Loader