नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात तब्बल ३८ वर्षांनंतर पोटनिवडणूक होत असून पहिल्यावेळी अशोक चव्हाण यांचे राजकीय पदार्पण झाले होते. आता दुसरे म्हणजे प्रा. रवींद्र चव्हाण हे पदार्पणातच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीतील जय किंवा पराजय यावर अशोक चव्हाण यांचे भाजपातील स्थान कोणत्या पायरीवर राहणार हे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला होता, पण जिगरबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवून पक्षाला यश मिळवून दिल्यामुळे अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश त्या पक्षासाठी लाभदायी ठरला नाही. मुंबई-दिल्लीतील भाजपा नेत्यांची त्यांनी निराशा केली.

हेही वाचा >>>अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

या पार्श्वभूमीवर आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण-पाटील यांच्याविरुद्ध संतुक हंबर्डे-देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे जिल्ह्यात निर्णायक असलेल्या मराठा समाजासमोर पाटील विरुद्ध देशमुख अशी लढत होणार आहे.

परंपरा कायम राहणार?

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. पुढे तीन महिन्यांनी त्यांचे अकाली निधन झाले. नांदेडमध्ये पूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली जागा राखली होती. एका फेरनिवडणुकीत हाच पक्ष विजयी झाला होता. ही परंपरा कायम राहणार, का तुटणार याचा निर्णय दोन आठवड्यांनी होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenging for ashok chavan in lok sabha by elections amy