सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : ‘खान की बाण’ आणि ‘मराठा की ओबीसी’ अशा दुहेरी राजकीय मतपेढीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पाचव्यांदा उमेदवारी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मजलिस – ए- इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाकडून ते केवळ चार हजार २३४ मतांनी ते पराभूत झाले. त्यामुळे मतदान करताना पूर्वी आपल्याकडून चूक झाली, अशी सहानुभूतीची भावना हे त्यांचे या वेळी शक्तीस्थान ठरू शकते. तसा विकास प्रश्नावर विरोधक त्यांना मागे ढकलतात. १९९९ पासून चंद्रकांत खैरे लोकसभेच्या राजकारणात होते. त्यामुळे दांडगा जनसंपर्क हे त्याचे बलस्थान. मात्र, जातीय समीकरणात शिवसेनाही अडकली आणि चंद्रकांत खैरे यांना त्याचा फटका बसला होता. मागील पराभूत सावणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेले नाही.

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हातात अनेक प्रकारचे गंडे दोरे, भाळी अष्टगंधाचा टीळा, मनगटात कडे घालणारे खैरे कमालीचे श्रद्धाळू. घरात आणि कार्यालयातही लावलेल्या देवतेच्या प्रत्येक प्रतीमेला हात जोडल्याशिवाय ते दिवस सुरू करत नाहीत. बऱ्याचदा त्यांच्या श्रद्धा अंधश्रद्धा बनल्या तरी त्यांना त्याची परवा नसते. ‘ मी हिंदू आहे,’ हे ते आवर्जून सांगातात. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतरही संघ परिवारातून चंद्रकांत खैरे यांच्या विषयी प्रखर टीका आतापर्यंत झाली नव्हती. गेल्या काही दिवसात शिवसेनेतील फूट, बदलेली दिशा लक्षात घेऊन चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम समाजातही संपर्क वाढविला आहे. उमदेवारी जाहीर होण्यापूर्वी वंचित आघाडीही बरोबर येईल अशी शक्यता दिसून येत होती. मात्र, शिवसेना- वंचित यांच्यामध्ये आता युती नसल्याने मिळणाऱ्या मतातील भर गृहीत न धरता ते आता कोणती रणनीती ठरवतात, यावर त्यांच्या जय-पराजयाचे गणित ठरू शकते.

आणखी वाचा-अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द झाल्याचा निर्णय कुणाच्या पथ्यावर?

२००९ मध्ये चंद्रकांत खैरे आणि उत्तमसिंग पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. तेव्हा चंद्रकांत खैरे यांना एकूण दोन लाख ५५ हजार ८९६ एवढे मतदार मिळाले होते. ते एकूण मतांच्या ४२.०८ टक्के होते. या निवडणुकीमध्ये वेरुळच्या शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांना २४.७ टक्के मते मिळाली होती. तेव्हा ते भाजपमध्ये युतीमध्ये लढत होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांच्या मताची टक्केवारी वाढून ती ५३ टक्के झाली होती. २०१९ मध्ये त्यांच्या मताची टक्केवारी ३२.०५ टक्के एवढी होती. या वेळी वंचित आघाडीने एमआयएमला पाठिंबा दिला होता. मराठा- ओबीसी या वादातून झालेल्या ध्रुवीकरणामुळे या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख ८३ हजार ७९८ मते घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनामुळे नव्याने तयार झालेल्या मतपेढीला चंद्रकांत खैरे बरोबर घेऊ शकतात का, यावर नवी समीकरणे ठरण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये खैरे यांनी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा पराभव केला होता. तेव्हा त्यांना तीन लाख ८१ हजार मते मिळाली होती. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी रामकृष्ण बाबा पाटील यांचा पराभव केला होता. पूर्वी कॉग्रेसबरोबर लढताना भाजपची त्यांना साभ होती. भाजप साथीला नसताना चंद्रकांत खैरे याची ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीत त्यांचा कस लागेल, असे मानले जात आहे.

आणखी वाचा-Loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आव्हान देणार्‍या सोनल पटेल कोण आहेत?

१९७१ ते २०१९ या कालावधीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ सात वेळा युतीने जिंकलेला होता. आता युती नसताना हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राखता येतो का, हा प्रश्न अधिक कळीचा बनण्याची शक्यता आहे. बहुपेढी राजकारणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास टाकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद दूर करुन चंद्रकांत खैरे पुन्हा नवी मोट बांधू शकतील का, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

Story img Loader