जालना – विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’मधील घटक पक्षांत काही ठिकाणी एकमत झाले नाही तर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भाकीत शिवसेना (शिंदे) उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुतीमधील घटक पक्षांत जागेसाठी मतभेद झाले तर पक्षश्रेष्ठी त्यामधून मार्ग काढतील. यापूर्वी एकत्रित शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. परंतु मैत्रीपूर्ण लढती होण्याऐवजी महायुतीचा एकच उमेदवार असावा या मताचे आपण आहोत. आपल्या घटक पक्षांत एखाद्या जागेवरून ओढाताण होऊन कार्यकर्ते विरोधातील पक्षांमध्ये जाणार असतील तर ते थांविण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीचा विचार करण्याची वेळ येऊ शकते. असे असले तरी तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी समन्वयातून एकच उमेदवार दिला पाहिजे, अशी भूमिका खोतकर यांनी मांडली.

हेही वाचा – वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

हेही वाचा – अकोल्यात उत्सवातून निवडणुकीची तयारी

महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांना विधानसभेच्या समसमान जागा दिल्या पाहिजेत. त्यातही काही जास्त जागा आमच्या पक्षाच्या वाट्याला आल्या पाहिजेत. कोणत्या एका पक्षाचे सरकार येईल, अशी परिस्थिती नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांची एकत्रित शक्ती आवश्यक आहे. राज्यात सत्ता हवी असेल तर तिन्हीपैकी कोणत्याही एका पक्षास बाजूस ठेवून चालेल, अशी राजकीय परिस्थिती नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांना आपसांत समन्वय ठेवून निवडणुकीस सामोरे जावे लागेल. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात महायुतीमधील तिन्ही पक्षांत श्रेयवादाची स्पर्धा सुरू असल्याच्या संदर्भातील प्रश्नावर खोतकर म्हणाले, हा तिन्ही पक्षांच्या सरकारचा निर्णय आहे. परंतु ही योजना अंमलात आणण्यात खऱ्या अर्थाने काकणभर का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे योगदान अधिक आहे.