पिंपरी : महायुतीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता असल्याने मित्रपक्षांमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोटनिवडणुकीत एक लाख मते घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी मतदारसंघ भाजपला सुटला, तरी देखील निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविलेले राहुल कलाटे यांचेही महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून जगताप कुटुंबीयांच्या हाती आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटणार असल्याचे निश्चित मानले जाते. आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. अश्विनी आणि शंकर जगताप या दीर-भावजयमध्ये उमेदवारीवरून संघर्ष असतानाच माजी नगरसेवकांच्या एका गटाने जगताप कुटुंबात उमेदवारी देण्यास उघडपणे विरोध केला आहे. त्यातच महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनीही दंड थोपटले आहेत.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

आणखी वाचा-Haryana Assembly Election 2024: कधीच न जिंकलेल्या मतदारसंघासाठी भाजपाची रणनीती; हरियाणातील या जागेवर प्रतिष्ठा पणाला!

पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेल्या काटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर काटे ठाम आहेत. महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार चिंचवडच्या जागेची मागणी करणार आहेत.

‘मला काम करण्याची सूचना त्यांनी केली आहे. चिंचवड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला नाही. मतदारसंघावर कोणाची मक्तेदारी नाही. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून निवडून येण्याची यंत्रणा राबविली जाते. त्याला बालेकिल्ला म्हणता येत नाही. चिंचवड मतदारसंघ भाजपला मिळाला तरी देखील मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेणार आहे. माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत. महाविकास आघाडीचाही पर्याय माझ्यासमोर असू शकतो’ असे काटे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण

राहुल कलाटे यांनीही काहीही झाले तरी निवडणूक लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. कलाटे यांनी पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, पक्ष प्रवेश रखडल्याने लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. आता उमेदवारीसाठी महाविकास आघाडीच्या पर्यायाची त्यांच्याकडूनही चाचपणी सुरू आहे.

‘मागील तिन्ही निवडणुकीत चिंचवडच्या जनतेने माझ्यावर प्रेम केले. पुन्हा मी जनतेसमोर जाणार आहे. कशा पध्दतीने, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष हे येत्या काही दिवसात कळेल’ असे कलाटे यांनी सांगितले. महाविकास आघाडीत चिंचवड मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो, त्या पक्षात प्रवेशाची त्यांची तयारी दिसत आहे. काटे, कलाटे या दोघांनीही निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरीची आणि पुन्हा तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.