चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने घवघवीत यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करतील. मात्र, या यशानंतरही जिल्हा भाजपमध्ये सत्तासंघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. मंत्रिपदी वर्णी आणि संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ चिमूरमधून कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार सलग दुसऱ्यांदा व भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा विजयी झाले. वरोरा व राजुरामधून अनुक्रमे करण देवतळे व देवराव भोंगळे हे दोन आमदार पाहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.

Girish kuber on regional party politics
Eknath Shinde: ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास होतो’, एकनाथ शिंदेंचं असंच होईल का?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Congress Big Leader Praises Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत ही चांगली गोष्ट, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून..” काँग्रेसच्या बड्या नेत्याची स्तुतीसुमनं
Ajit pawar and Eknath Shinde photo of Amit Shah Meeting
Video: ‘अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य, तर शिंदेंचा चेहरा पडला’, मावळता सूर्य म्हणत संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Eknath Shinde Statement After Mahayuti meet
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं महायुतीच्या बैठकीनंतर सूचक वक्तव्य, “मी काळजीवाहू मुख्यमंत्री, आता…”
Maharashtra Government Formation Live Updates : गोंदिया शिवशाही बस अपघात : मृतकांची संख्या ११, आणखी वाढण्याची शक्यता

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्‍यांमधील संघर्ष वाढणार

पहिला संघर्ष हा मंत्रिपदासाठीच होईल, असे बोलले जाते. मुनगंटीवार, भांगडिया आणि जोरगेवार यांच्यात चढाओढ आहे. मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी तिघेही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, यावरच या तिघांचे मंत्रिपद अवलंबून आहे. भाजपमध्ये सध्या ‘गुजरात पॅटर्न’ची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा विषय तसेच आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक लक्षात घेता तीनपैकी कोणताही आमदार नाराज होणार नाही, याची काळजी भाजपश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. त्यात मंत्रिपदी कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, पक्ष संघटनेवरदेखील वर्चस्व मिळण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या भाजप शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुनगंटीवार यांच्या गटाचे आहेत. चंद्रपूर मतदारसंघातून जोरगेवार निवडून आल्याने ते स्वतःच्या समर्थकांची या पदावर नियुक्ती व्हावी, यासाठी नक्कीच आग्रही राहतील. भाजप शहराध्यक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील कामावर जोरगेवार नाराज आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ गठीत झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

हेही वाचा – BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेड ही संघटना भाजपत विलीन केलेली नाही. त्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भाजपमधील संघटनात्मक पदावर वर्णी लागावी म्हणून ते प्रयत्न करतीलच. दुसरीकडे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना देखील संघटना स्वतःकडे हवी आहे. त्यामुळे अहीर व जोरगेवार एकत्र येऊन या दृष्टीने प्रयत्न करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्यातरी सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ स्थापनेकडे आहे. या सर्व घडामोडींवर भाजप नेते लक्ष ठेवून आहेत.