चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मागील फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेतर्फे आलेल्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय कोंडीत सापडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मदतीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धावून आले. उद्धव ठाकरे हेच त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख असल्याने एकनाथ शिंदे यांचा त्यात काही दोष नाही असा निर्वाळा बावनकुळे यांनी दिला आहे.

हेही वाचा… एकनाथ शिंदेंबाबतचे विधान आणि भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोक चव्हाणांवरील पक्षांतराचे मळभ दूर होणार?

२०१४ ते १९ दरम्यान भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात सातत्याने आगपाखड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली.

हेही वाचा… भाजपचे पुढचे लक्ष्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार!; मविआ सरकारच्या काळातील बस खरेदीच्या चौकशीद्वारे राजकीय वेढा

फडणवीस सरकार पाडण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या या शिष्टाईबाबत आता भाजप काय भूमिका घेणार याची उत्सुकता असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत भाष्य केले पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले आणि राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरे तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसनेची सूत्रे नव्हती, असेही बावनकुळे म्हणाले.