नाशिक : जिल्ह्यातील चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपमधील भाऊबंदकीचे रुपांतर बंडखोरीत होण्याच्या मार्गावर आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने चुलत बंधू भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करीत आमदार भावावर कठोर शब्दांत हल्ले चढविण्यास सुरुवात केल्यामुळे कौटुंबिक कलह उफाळून आला आहे.

सलग दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. राहुल आहेर यांनी यंदा भावासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. परंतु, भाजपने त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे पक्षासमोर बंडखोरीचे संकट उभे ठाकले आहे. उभय बंधुंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, उमेदवारीत बदल होण्याची शक्यता नसल्याने केदा आहेर यांनी भावाविरोधात शड्डू ठोकले आहेत. चांदवड, देवळा येथे मेळाव्यातून त्यांनी भाजप उमेदवार तथा चुलत बंधू डॉ .राहुल आहेर यांच्यावर आगपाखड केली. आजवर शांत, संयमी वाटणाऱ्या भावाचे दुसरे रुप सर्वांना दिसले. जो भावाचा झाला नाही, तो जनतेचा काय होईल, असा प्रश्न केदा आहेर यांनी केला. पक्षाने उमेदवारीचा निर्णय आधीच घेतला असतानाही भावाने नंतर माघार घेत असल्याचे सांगून दिशाभूल केली. अवहेलना केली. ज्याला जमीन कसण्यासाठी दिली, तो मालक होऊन बसला. आपण १० वर्ष त्याग करूनही गलिच्छ राजकारण करण्यात आल्याची तोफ डागत केदा यांनी कुठल्याही परिस्थितीत मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले.

Rashmi Barve nominate from Umred reserved constituency
दलित महिलेवर अन्यायाचे प्रतीक, काँग्रेसची जबरदस्त खेळी, रश्मी बर्वे यांना उमरेडमधून उमेदवारी
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Thane constituency BJP, Shinde faction Thane,
ठाणे मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने शिंदे गटात अस्वस्थता
Anuradha Nagwade, Rajendra Nagwade,
अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे
Ajit Pawar news, Ajit Pawar Parner, Ajit Pawar latest news, Ajit Pawar marathi news, Ajit Pawar news in marathi news,
VIDEO : सभेत कार्यकर्त्यांच्या बॅनर फडकवत घोषणा; ‘ज्या गावच्या बोरी त्याच, गावच्या बाभळी’ असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं
dispute in maha vikas aghadi over ballarpur constituency seat
काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान

हेही वाचा : झारखंड विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपाच्या १२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पक्षावर घराणेशाहीचा आरोप

उमेदवारीवरून आहेर कुटुंबाप्रमाणे स्थानिक भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. केदा यांना उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ देवळा नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाने नगरपंचायतीवरील सत्ता गमावली. जिल्ह्याच्या राजकारणात आहेर कुटुंबियांचा प्रदीर्घ काळापासून प्रभाव आहे. आमदार राहुल यांचे वडील डॉ. दौलतराव आहेर हे युती शासनात आरोग्यमंत्री होते. नाशिक महापालिकेत कुटुंबियांना अनेक महत्वाची पदे मिळाली होती. मागील दोन निवडणुकीत आहेर कुटूंबात मतैक्य होऊन भावासाठी केदा आहेर हे निवडणूक लढले नव्हते. मात्र, आता ते थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे भाऊबंदकी बंडखोरीपर्यंत पोहोचली आहे. घरात कलह होऊ नये, यासाठी उमेदवारी न करण्याची आपण भूमिका घेतली होती. पण, त्यास यश आले नाही. आता पक्षाचा आदेश पाळावा लागेल. लवकरच महायुतीचा मेळावा होऊन २७ किंवा २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी म्हटले आहे. केदा आहेर यांनी बंडखोरी करू नये, यासाठी चर्चा सुरू असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.