साताऱ्याला चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळाल्याने सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळत आहे. रविवारी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले. यासाठी कार्यकर्त्यांनी क्रेन, जेसीबीच्या साह्याने मंत्र्यांना हार घालण्याची तयारी केल्याने फुलविक्रेत्यांना व जेसीबी, क्रेनचालकांना अच्छे दिन आले. दहा हजारापासून चाळीस हजारापर्यंतच्या हाराची विक्री झाल्याने फुलविक्रेते खूश आहेत. नेत्यांना भेटायला जाणारेही बुके घेऊन जात असल्याने बुकेची विक्रीही चांगलीच वाढली आहे. त्यामुळे रोज एकाच नेत्यांनी यावे म्हणजे आमची धावपळ होणार नाही आणि ग्राहकांना उत्तम डिझाइनचे हार आणि बुके देता येतील, असेही फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, चार- चार मंत्र्यांची बडदास्त राखताना शासकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल.

(संकलन : विश्वास पवार)

Story img Loader