लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या नावे थेट बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. शासनाने यासाठी आर्थिक तरतुदही केली आहे. याचा राजकीय लाभ मिळवण्याचा भाजपचा अटोकाट प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेची जाहिरात करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हा स्तरावर मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थितीही पाहयला मिळाली. मात्र, महिला कार्यक्रम होईपर्यंत थांबव्यात यासाठी पोटपूजेची व्यवस्थाही कार्यक्रमस्थळी करण्यात आली. कार्यक्रम सुरू झाला तरी जेवणाची रांग काही केल्या कमी होईना. यामुळे अखेर संयोजकांना भोजनकक्षात आवराआवरीची सूचना करावी लागली. म्हणतात ना ‘भजनाला आठ आणि भोजनाला साठ’ अशी गत झाली.

जे काँग्रेसमध्ये तेच भाजपमध्ये …

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण झोके खात आहे. भाजपची उमेदवारी त्याचा केंद्रबिंदू बनली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुन्हा कंबर कसली आहे. अपक्ष निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा जाहीर करणारे आमदार प्रकाश आवाडे या पक्षात प्रवेश मिळावा यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करताना दिसतात. अद्यापही ते प्रतीक्षा यादीत असून ती कधी संपणार हे न उलगडणारे कोडे आहे. हे जाणून आता त्यांनी मोदी महिमा गातच ताराराणी पक्षाच्या वतीने अपक्ष राहण्याची तयारी चालवली आहे. विणकर अधिवेशनात बोलताना सुरेश हाळवणकर यांनी म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ते शिरसावंद्या मानत आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांना पुढे आणले आहे.’’ त्यांचा सारा रोख हा आवाडे पुत्रासाठी सुरू असलेला खटाटोप बघूनच होता हे स्पष्टच आहे. भाजपचे नेतृत्व हाळवणकर व आवाडे यांना झुलवत ठेवून कोणाला संधी देतात हे बघायचे. काँग्रेसमध्ये अशी भांडणे लावण्याचे उद्याोग वर्षानुवर्षे चालत तेच आता भाजपमध्ये सुरू झाले आहे.

amit Deshmukh nilanga vidhan sabha marathi news
कारण राजकारण: संभाजी निलंगेकरांना घेरण्याची देशमुख यांची व्यूहरचना, विजय खडतरच…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Supreme Court Verdict On Mining Tax
अग्रलेख : पूर्वलक्ष्यी पंचाईत!

हेही वाचा : Vishwa Hindu Parishad : दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धर्म संम्मेलनाचं आयोजन; भाजपाच्या मदतीसाठी संघ परिवार मैदानात?

जर तरला काही अर्थ नाही

लोकसभा निवडणुकीत भाजपला कांद्याच्या दर आणि निर्यातबंदीचा फटका बसला. त्यामध्ये नगरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचाही समावेश आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात सुजय विखे यांच्या हस्ते नेमके नेप्ती (ता. नगर) उपबाजाराच्या आवारातील कांदा भाव फलकाचे अनावरण करण्यात आले. या फलकावर त्यादिवशी कांद्याला ३८ रुपये प्रति किलो असा दर मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा भाव असता तर कांद्यामुळे माझा वांदा झाला नसता, अशी मिश्किल टिप्पणी विखे यांनी केली. राजकारणात जर-तरला काही अर्थ नसतो हे विखे-पाटील यांच्या एव्हाना लक्षात आले असेल.

(संकलन : मोहनीराज लहाडे, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे )