भाजपने ‘चारसो पार’ म्हणजेच ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिल्याने त्याची वेगळी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ४०० पेक्षा अधिक जागा आल्यावर भाजप घटना दुरुस्ती करणार, अशा चर्चा वेगाने पसरली. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचा खुलासा करावा लागला. नाही म्हटले तरी समाजातील एका वर्गावर त्याचा परिणाम होतोच. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने भाजपशी हातमिळवणी केली असली तरी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. अन्यथा शरद पवार गट लगेचच त्याचा फायदा उठवायचा ही भीती वेगळी. महायुतीत लोकसभेच्या चार जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीने मोठया थाटामाटात जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. पक्ष जरी चार जागा लढवीत असला तरी आंतरराष्ट्रीय ते गल्लीपर्यंतच्या विविध प्रश्नांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. जाहीरनाम्याच्या दुसऱ्याच पानावर ‘आमचा मूलमंत्र’ म्हणून भारताच्या संविधानाची उद्देशिका छापण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची चर्चा सुरू असल्यानेच आम्ही घटनेला बांधील आहोत हे दाखविण्यासाठी हा सारा खटाटोप केल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा