श्री.फ.टाके
धन्यवाद भुजबळसाहेब. अखेर तुम्ही राज्यात दीर्घकाळापासून चालत आलेल्या पुतण्यांच्या राजकीय दगाबाजीला वाचा फोडलीच. राजकारणातल्या सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच हे तुमचे भरतवाक्य या क्षेत्रात येऊ घातलेल्या सर्व पुतण्यांवर परिणाम करेल हे नक्की. खरे तर पुतणे दगाबाज का निघतात यावर तुम्ही सर्व काकालोकांनी आता संशोधन करायला हवे. स्वत:ची मुले, मुली लहान असल्याने राजकारणात घ्यावी लागते या पुतण्यांची मदत. म्हणून काय त्यांनी नंतर डोक्यावर मिरे वाटायचे? हे योग्य नाहीच. डीएनएचा मुद्दा काढताना तुम्ही तुमच्याच पक्षाच्या अजितदादा व धनंजय मुंडेंचेही अप्रत्यक्षपणे कान टोचले हे बरे झाले. त्यामुळे या बंडखोरीसाठी तुम्हाला बोल लावण्याची हिंमत आता किमान पक्षात तरी कुणी करणार नाही. पंकजला आमदार केले मग समीरने काय घोडे मारले असा कुजकट प्रश्न विचारतात काही लोक. यात समीर ज्यांच्याविरुद्ध लढतो त्या शिंदेसेनेचे लोक आघाडीवर पण लक्ष देऊ नका तिकडे. तुमच्या या वक्तव्यामुळे सर्वात थोरले काका ऊर्फ मोठे साहेब नक्कीच खूश झाले असतील. म्हणजे आता त्यांच्या भेटीला जाताना तुम्हाला ताटकळत बसावे लागणार नाही.

सोफ्यावर आराम करतो असे ताईंना सांगावे लागणार नाही. पण काय हो छगनराव, काही लोक म्हणतात समीरच्या या बंडाला तुमचीच मूक संमती आहे. अगदी पंधरा दिवसांपूर्वी तुम्ही नांदगावात समीरच्या वाढदिवसाला गेलात तेव्हा पुतण्याला सांभाळून घ्या, असे जाहीरपणे म्हणाला होतात. या सांभाळून घेण्याचा अर्थ निवडून द्या असा काढायचा का? जरा विचार करून हळुवार आवाजात उत्तर द्या कधीतरी. बाकी मुलगा व पुतण्या या दोघांनाही ‘योग्य’रीतीने न्याय देऊन सांभाळण्याची तुमची युक्ती भारीच. तुम्ही उल्लेखलेल्या बाकी घराण्यांतील पुतण्यांचे बंड दीर्घकाळ टिकले. तुमचे अल्पकाळ टिकेल. मग तीन आमदारांचा निवास असलेले फार्महाऊस आहेच ना जनतेची सेवा करायला.

Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
CJI Dhananjay Chandrachud
“अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसलो अन्…”, सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Loksatta editorial Loksatta editorial on symbolic changes in new lady of justice statue by supreme court
अग्रलेख: न्यायदेवता… न्यायप्रियता!
Prime Minister Narendra Modi statement on Pali language
भगवान बुद्धांच्या महान वारशाचा गौरव; ‘पाली’ भाषेच्या अभिजात दर्जावर पंतप्रधान मोदींचे कौतुकोद्गार
Mahayuti, Mahavikas Aghadi Vidarbha,
विदर्भातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे महायुती, महाविकास आघाडीचे लक्ष्य
raj thackeray appeal
“सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला त्याबद्दल आभार, पण…”; राज ठाकरेंचा थेट इशारा!
Ramdas athawale Assembly Elections 2024 ministership
आपटीबार: आठवले, विसरू नका!