कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच प्रमुख पक्षांना तेलंगणा, छत्तीतसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या या निवडणुका जिंकणे गरजेचे असल्यामुळे सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. दरम्यान, छत्तीसगडमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षातील दुफळी समोर आली आहे.

छत्तीसगडमध्ये नेमके काय घडले?

छत्तीसगड राज्याच्या प्रभारीपदी कुमारी शैलजा आहेत. तर छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष पद मोहन मरकाम यांच्याकडे आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मरकाम यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर १६ जून रोजी त्यांनी सहा नेत्यांच्या जबाबदारीमध्ये फेरबदल केले. अरुण सिसोदिया ये मरकाम यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे मरकाम यांनी सिसोदिया यांच्यावर पक्षातील प्रशासन आणि संघटना विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ही जबाबदारी या याधी अनुक्रमे रवी घोष आणि अमरजित चावला यांच्याकडे होती.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

मरकाम यांनी संघटनेत काही फेरबदल केले

मरकाम यांनी घोष यांच्याकडे बस्तर विभागाची जबाबदारी सोपवली. तर चावला हे मरकाम यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्यावर रायपूर शहर, राज्य युवक काँग्रेस, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या राज्य विभागाची जबाबादारी सोपवली. यशवर्धन राव यांच्यावर प्रशिक्षण (पक्षाचे कार्यकर्ते) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. यशवर्धन हे मरकाम यांच्या जिल्ह्याचे आहेत.

मरकाम यांनी केलेल्या नियुक्त्या शैलजा यांनी केल्या रद्द

मरकाम यांनी नियुक्त्यांमध्ये फेरबदल केल्यानंतर २१ जून रोजी शैलजा यांनी एक आदेश जारी केला. या आदेशांतर्गत मरकाम यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. तसेच रवी घोष यांना पक्षाच्या प्रशासन आणि संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करावी असा आदेश दिला. या आदेशानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आम्ही शैलजा यांच्या आदेशाचे पालन करू- मरकाम

शैलजा यांनी मरकाम यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश दिलेला असला तरी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत मरकाम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही शैलजा यांचा आदर करतो. त्यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करू. मी नियुक्त केलेले नेते त्या-त्या पदासाठी योग्य आहेत, असे मला वाटले होते. याच कारणामुळे मी या नियुक्त्या केल्या होत्या. माध्यमं या प्रकरणाला वेगळे वळण देत आहे. शैलजा जे सांगतील आम्ही त्याचे पालन करू,” असे मरकाम यांनी सांगितले.

…म्हणून शैलजा यांनी दिला आदेश

सूत्रांच्या माहितीनुसार मरकाम यांनी संघटनेत फेरबदल करताना शैलजा यांना कल्पना दिली नव्हती. याच कारणामुळे शैलजा यांनी मरकाम यांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश दिला. पक्षातील काही नेत्यांनी मरकाम यांना पाठिंबा दिला आहे. “मरकाम यांनी कोणाचीही नव्याने नियुक्ती केलेली नाही. त्यांनी फक्त फेरबदल केला. याच कारणामुळे त्यांनी शैलजा यांना कल्पना दिली नाही,” असे काही नेत्यांचे मत आहे.

भूपेश बघेल यांना मरकाम नको आहेत

मिळालेल्या माहितीनुसार मकाम यांची प्रदेशाध्यक्षपदापासून उचलबांगडी व्हावी असे भूपेश बघेल यांना वाटते. या दोन नेत्यांमध्ये वाद नसला तरी भूतकाळात या नेत्यांमध्ये अनेक प्रकरणांत मतभेद होते, असे सांगितले जाते. “आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता लवकरच तिकीट वाटपासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीमध्ये मरकाम आणि बघेल हे महत्त्वाचे नेते असतील. हे नेतेच कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणत्या विद्यमान आमदाराला तिकीट नाकारायचे हे ठरवतील. त्यामुळे बघेल यांना मरकाम यांच्या जागेवर सहमती दर्शवणारा अन्य नेता हवा आहे. एका जागेसाठी अनेकजण दावेदार असतील तर त्या जागेबाबतचा निर्णय दिल्लीतून घेतला जाईल,” अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.

मरकाम प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता

दरम्यान, मरकाम यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. असे असले तरी आगामी निवडणूक लक्षात घेता प्रदेशाध्यक्षपदावर अन्य नेत्याची निवड करणे सध्यातरी संयुक्तिक ठरणार नाही, असे पक्षाला वाटते. त्यामुळे मरकाम प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे.