नवी दिल्ली: शहरी भागातील मतदारांमधील निरुत्साहाबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र तसेच झारखंडमध्ये मतदानाच्या तारखा आठवड्याच्या मध्यात ठेवण्यात आल्या आहेत. याचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी हा आहे. मुंबई तसेच पुण्यात कमी मतदान होत असल्याचा मुद्दा आयोगाने सातत्याने उपस्थित केला आहे. ही टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने जनजागृती अभियान हाती घेतल्याचे राजीवकुमार यांनी नमूद केेले. गुरगाव, फरिदाबाद तसेच हैदराबादमधील ज्युबिली हिल्स तसेच दक्षिण बंगळूरु, मुंबईतील कुलाबा, गुजरातमधील गांधीनगर तसेच पुणे व ठाण्यात मतदानाची टक्केवारी राज्याच्या तुलनेत कमी राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. २०१९ मध्ये शहरी भागात सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. मात्र राज्याच्या तुलनेत ते कमीच होते. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत उच्चभ्रू भागात राज्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमीच मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा