देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना प्रेम, दया , करुणा दाखवली..पण मी फडणवीस यांना सांगितले आहे की ती एकदाच दाखवता येते सारखी सारखी नाही, अशा शब्दांत मुंडे यांच्या वर्मावर बोट ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सूचक इशारा दिला. थेट नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावर उत्तर देत असताना एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला.
हेही वाचा- …तर मग मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून द्या… अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात एकनाथराव तुम्ही भाजपचे ऐकनाथराव होऊ नका, टोला मारला होता. शिंदे यांनी आपल्या भाषणात त्याची सव्याज परतफेड केली.धनंजय मुंडे हे करुणा शर्मा या महिलेच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले होते. त्याचा संदर्भ देत पण त्या प्रकरणाचा उल्लेख टाळत एकनाथ शिंदे यांनी सूचक उल्लेख केला. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात आक्रमकपणे टीका केल्यास जुने प्रकरण पुन्हा त्रासदायक ठरू शकते असा अप्रत्यक्ष गर्भित इशाराच एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांना दिला.
हेही वाचा- ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… विरोधकांच्या ईडी सरकारविरोधात घोषणाबाजी
तसेच फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांची मैत्री असली तरी ती नेहमी उपयोगी पडणार नाही असेही शिंदे यांनी सूचित केले.शिंदे यांच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी शिंदे गट व भाजपाच्या आमदारांनी बाकी वाजून त्यांच्या हजरजबाबीपणाला व आक्रमकतेला दाद दिली.