अभिमन्यू लोंढे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावंतवाडी: माझा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सभेत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असे, माजी खासदार तथा भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

,आपले वडील नारायण राणेंची राजकीय सुरुवात ज्या पक्षातून ज्या धनुष्यबाण चिन्हावर झाली त्याच चिन्हावर मला निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे याचे मला आनंद व समाधान आहे असे राणे यांनी सांगितले . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपले प्रेम होते . आजही आपले प्रेम आहे. यापुढेही राहणार आहे असे सांगत निवडणूक जिंकायची हे आपले प्रथम उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Nilesh Rane to Joins Shivsena: तब्बल २० वर्षांनी निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार

महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) वाट्याला आला आहे. गेल्या काही वर्षापासून मी या मतदारसंघात काम करत आहे तेव्हापासून मला भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहकार्य दिले आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde in kudal for shiv sena enter of nilesh rane print politics news amy