पालघर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठया विजयामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतूनच आव्हान उभे रहात असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. एकसंघ शिवसेनेतून सलग तीन वेळा आमदार झालेल्या माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत रविवारी सकाळी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. निमकर यांच्या पक्ष प्रवेशाला बोईसर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. बोईसर मतदारसंघावर भाजप दावा सांगत असताना निमकर यांचा प्रवेश घडवून शिंदे यांनी या जागावर आपल्या पक्षाचा दावा कायम ठेवल्याने भाजपच्या इच्छुकांच्या गोटात मात्र चिंतेचा सुर आहे.

१९९५ पासून पालघर विधासभेतून निवडून येणाऱ्या निमकर यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभव झाला. पुढे त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आणि २०१४ आणि २०१६ची पोटनिवडणुकही लढवली. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. सलग तीन पराभवानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याऐवजी त्यांनी जिल्हा परिषदेचे राखीव असलेल्या अध्यक्षपद लक्षात ठेवून जिल्हा परिषदे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला समाधानकारक यश लाभले नव्हते. तरी देखील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्या बहुजन विकास आघाडीला समाजकल्याण सभापतीपद मिळाले आणि निमकर यांची त्या पदावर वर्णी लागली.

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
brigadier Sudhir sawant
शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी बांधले शिवबंधन
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

हेही वाचा >>>खतगावकर व वसंत चव्हाण कुटुंबातील वाद मिटला!

बोईसरवर दावा

आमदार ते जिल्हा परिषदेचे एक सभापतीपद असा उलटा राजकीय प्रवास करणाऱ्या निमकर यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत पालघर, बोईसर विधानसभा क्षेत्रात बहुजन विकास आघाडीची मर्यादित ताकद दिसून आली. त्यामुळे निमकर या पक्ष बदलतील अशीच चर्चा होती. तीन-चार आठवड्यांपूर्वी त्या शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र आयत्यावेळी माशी शिंकली आणि त्यांचा पक्षप्रवेश लांबीवर पडला होता. रविवारी मात्र फारसा गाजावाजा न करता त्यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचे समजते.

हेही वाचा >>>रायगडमध्ये महिला मतांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी

भाजपमध्ये अस्वस्थता ?

बोईसर विधानसभा क्षेत्रात सध्या बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे आमदार असून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. महायुती तर्फे बोईसर विधानसभा क्षेत्रावर भाजपा तसेच शिवसेना (शिंदे) पक्षांकडून दावा केला जात आहे. भाजपाकडून बहुजन विकास आघाडी चे माजी आमदार विलास तरे, संतोष जनाठे हे इच्छुक असून शिवसेना शिंदे गटाकडून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आहेत. असे असले तरी निमकरांच्या पक्ष प्रवेशामुळे या जागेवर शिवसेनेचा (शिंदे) दावा प्रबळ झाल्याची चर्चा आहे. पाच वर्षांपुर्वी ही जागा एकसंघ शिवसेनेच्या वाट्याला आली होती. यंदा काहीही झाले तरी ही जागा सोडायची नाही असा चंग मुख्यमंत्र्यांच्या गोटात बांधला जात असून निमकरांचा पक्ष प्रवेश हा याच रणनितीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.