ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविषयी नाराज असलेले शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र असून अशा स्वपक्षीय नाराज पदाधिकाऱ्यांची संजय केळकर यांच्या समक्ष समजूत काढून त्यांना प्रचार कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. तसेच कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्लाही त्यांनी केळकर यांना कार्यकर्त्यांसमक्ष दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे हे इच्छुक होते. यातून ही जागा पक्षाला देण्याचा आग्रह धरत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती, परंतु हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते. यामुळे या मतदारसंघातील बंडखोरी टळली होती. असे असले तरी संजय भोईर, मीनाक्षी शिंदे हे दोघेही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले नाहीत. ठाणे महापालिकेत शिंदे गटाची आजवर सत्ता राहिली असून या पालिकेतील कारभारावर टीका करत केळकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

हेही वाचा >>>Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?

दरम्यान, या आरोपांच्या माध्यमातून पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केळकर यांनी केल्यामुळे त्यांच्याविषयी शिंदे गटातील काही पदाधिकारीही नाराज होते. यामुळेही नाराज पदाधिकारी प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाण्यात महायुतीचा मेळावा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष स्वपक्षातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेतले. केळकर हे विरोधकांना मदत करतात आणि यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते, अशा तक्रारी काही पदाधिकाऱ्यांनी या वेळी केल्या. त्यावर शिंदे यांनी पक्षातील नाराजांची समजूत काढून त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. तर कार्यकर्त्यांना जपण्याचा सल्लाही त्यांनी केळकर यांना कार्यकर्त्यांसमक्ष दिल्याचे सूत्रांनी सांगितले.