महेश सरलष्कर, उदयपूरवाटी (राजस्थान)

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही माझ्यासारखे क्षत्रिय आहेत म्हणून मी शिवसेनेत गेलो’, असे उदयपूरवाटीतील विद्यमान आमदार राजेंद्र गुढा यांचे म्हणणे होते. यावेळी गुढा शिवसेनेच्या धनुष्य-बाणावर राजस्थानमध्ये निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या कथित भ्रष्टाचाराची ‘लाल डायरी’ विधानसभेत दाखवणारे आमदार ही गुढांची ओळख. गेहलोतांविरोधात भाजपच्या हाती कोलित मिळाल्यामुळे लाल डायरी आणि गुढा दोन्हीही चर्चेत आहेत.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

२०१८ मध्ये राजेंद्र गुढा ‘बसप’च्या तिकिटावर निवडून आले. मग, काँग्रेसमध्ये जाऊन मंत्री झाले. २००८ मध्येही ते ‘बसप’चे आमदार झाले. २०१३ मध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली पण, पराभूत झाले. उदयपूरवाटीमध्ये परंपरागत ‘बसप’चा पगडा असल्यामुळे २०१८ मध्ये ते विजयी झाले. यावेळी काँग्रेसचे भगवानराम सैनी आणि भाजपचे शुभकरण चौधरी या दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी मिळाली आहे. हा मतदारसंघ अशोक गेहलोत यांच्यासाठी वैयक्तिक महत्त्वाचा ठरला असून त्यांनी गुढांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. सैनी मतांमध्ये विभाजन टाळण्यासाठी गेहलोत यांनी ‘बसप’चे उमेदवार संदीप सैनी यांचे मन वळवले आहे. आता ‘बसप’च्या सैनीने काँग्रेसच्या सैनीला पाठिंबा जाहीर दिली आहे. या घडामोडींमुळे गुढांना यंदा विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. वातावरण निर्मितीसाठी गुढा उदयपूरवाटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचारसभा आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, राज्यात व्यग्र असल्यामुळे शिंदेंना राजस्थानात जाता आलेले नाही. ‘एनडीए’मध्ये असल्यामुळे भाजपविरोधात निवडणूक लढवता येणार नसली तरी शिवसेनेने गुढांबाबत अपवाद केलेला आहे. गुढा शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असले तरी, त्यांचे अन्य ‘सहकारी’ अपक्ष लढत आहेत. २०१८ मध्ये राजेंद्र गुढा यांच्यासह ‘बसप’च्या सहाही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अशोक गेहलोत यांचे सरकार मजबूत केले होते. यावेळी अपक्ष व इतर पक्षांचे आमदार कोणत्या पक्षाचे सरकार मजबूत करतात, हा औत्सुक्याचा विषय असेल.

आणखी वाचा-मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद; येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

गेल्या वेळी अशोक गेहलोत यांनी अपक्ष आणि बसपचा पाठिंबा घेताना गुढांना मंत्री केले पण, अपेक्षित खाते न मिळाल्यामुळे ते नाराज झाले होते. स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी गुढांनी गेहलोतांविरोधात भूमिका घेतली. गेहलोत यांचे पुत्र वैभव यांचा राजस्थान क्रिकेट असोसिएशनमधील कथित भ्रष्टाचार, गेहलोत सरकारमधील घोटाळ्यांचा हिशोब असणारी ‘लाल डायरी’ विधानसभेत दाखवून राजकीय गोंधळ निर्माण केला होता. गेहलोतविरोधी कृत्यामुळे गुढांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली. मग, राजकीय अस्तित्वासाठी गुढांनी शिवसेनेचा धनुष्य-बाण हाती घेतला. ‘मला मोदी-शहांनी भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. पण, मी कोणाच्याही नियंत्रणाखाली राजकारण करत नाही. भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या अधिपत्याखाली वावरावे लागेल. हेच नेते नंतर केंद्रातील नेत्यांना माझ्याबद्दल कागाळ्या करतील’, असे सांगत गुढांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागील कारण स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यामध्ये अशोक गेहलोतांच्या उदयपूरवाटीच्या दौऱ्यावेळी गुढांनी लाल डायरीच्या चार पानांतील तपशील जाहीर केला होता. गेहलोत पुन्हा आले की, आणखी तपशील जाहीर करेन, असा दावा गुढांनी केला. कधी काली गेहलोतसमर्थक असलेले गुढा सचिन पायलट यांचे समर्थन करत आहेत. ‘२०१८ मध्ये सचिन पायलटांमुळे काँग्रेसला सत्ता मिळाली होती, त्यांना मुख्यमंत्री करायला हवे होते’, असे गुढांचे म्हणणे आहे. २०२३ मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवले आणि काँग्रेसच्या हायकमांडने पायलटांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली तर गुढांसारखे ‘पाशमुक्त’ नेते पायलटांच्या मदतीला येऊ शकतात. पण, सध्या ‘एनडीए’चा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा भगवा झेंडा उदयपूरवाटीत गुढा फडकवत आहेत.

आणखी वाचा-मराठा – ओबीसी नेत्यांमधील इशारे- प्रतिइशाऱ्यांमुळे सामाजिक दुही वाढली

राजस्थानमधील प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांनी लाल डायरीचा उल्लेख करून गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने मात्र गुढा आणि भाजप यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. गुढांच्या लाल डायरीमुळे गेहलोतांना सातत्याने स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. राजस्थानमध्ये भाजप पराभूत असल्यामुळे अस्वस्थ होऊन बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे गेहलोत यांचे म्हणणे आहे. लाल डायरीचा भाजपने पुरेपूर राजकीय वापर केला असला तरी, गुढा मात्र भाजपविरोधात लढत असल्याचा दावा करत आहेत. भाजपच्या क्षत्रिय नेत्या वसुंधरा राजे यांचे नेतृत्वही गुढांना मान्य नसून वसुंधरा राजे सरकार अत्यंत भ्रष्ट होते, अशी टीका गुढांनी केली. गुढांच्या उमेदवारीमुळे उदयपूरवाटीतील लढाई गेहलोत विरोधी झाली आहे.

Story img Loader