सुजित तांबडे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत होणारी चुरस पाहता धोका टाळण्यासाठी आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी कसब्याच्या लढाईत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या पोटनिवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे येत्या सोमवारी, २० फेब्रुवारीला पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नाराजांना हेरण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!

कसब्याची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात चुरस आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांना बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. मनसेने भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, धंगेकर यांनी यापूर्वी दोनवेळा कसबा विधानसभा निवडणूक लढविली असल्याने; तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असल्याने भाजपच्यादृष्टीने ही निवडणूक आव्हानात्मक झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्याहून कुमक पाठविली असली, तरीही नामुष्की पत्करावी लागू नये, यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही त्यांनी प्रचारात भाग घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. तरीही निवडणुकीतील चुरस लक्षात घेता दगाफटका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत.

कसब्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यामुळे या गटातील काहीजण नाराज आहेत. त्यांना हेरण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेकडून सांगण्यात आले. याबाबत बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, ‘कसब्यातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. ठाण्याहूनही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत’

पुण्यातील ‘शिवसेना भवन’ तयार

बाळासाहेबांची शिवसेनेचे ‘शिवसेना भवन’ तयार झाले आहे. सारसबाग येथे हे भवन असणार आहे. पोटनिवडणुका झाल्यानंतर या भवनचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितले.