लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील झाले आहेत. तशी अधिकृत घोषण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १७ जुलै रोजी केली. १८ जुलै रोजी एनडीएची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. असे असताना एक दिवस अगोदर म्हणजेच १७ जुलै रोजी चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

रामविलास पासवान असताना मिळाल्या होत्या ६ जागा

एनडीएमध्ये सामील होण्याआधी चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) पक्षाला लोकसभा निवडणुकीत किती जागा देण्यात येणार? बिहारच्या विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. २०१९ साली लोक जनशक्ती पार्टीमध्ये दोन गट पडलेले नव्हते. तेव्हा चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांना भाजपाने लोकसभेच्या सहा जागा दिल्या होत्या. तसेच त्यांना राज्यसभेचीही जागा देण्यात आली होती. 

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

लोकसभेच्या सहा जागा देण्याची मागणी

आता नव्याने एनडीएमध्ये सामील होताना चिराग पासवान यांनी पुन्हा एकदा आम्हाला सहा जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे. मात्र यावेळी लोक जनशक्ती पार्टीत दोन गट पडलेले आहेत. दुसऱ्या गटाचे नेतृत्व चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस करतात. या गटाचे नाव राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी असे आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी हा गट सध्या एनडीएचा भाग आहे. 

हाजीपूरमधून लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी  

मिळालेल्या माहितीनुसार चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सामील होताना मला लोकसभेची हाजीपूर जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. रामविलास पासवान या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. हा मतदारसंघ चिराग पासवान यांच्यासाठी सुरक्षित समजला जातो. मात्र सध्या या जागेवरून पारस लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात.

नितीश कुमार यांच्यामुळे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय 

दरम्यान, २०२० साली बिहारमधील नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाने भाजपासोबत युती केली होती. त्यामुळे चिराग पासवान यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे २०२२ साली नितीश कुमार यांनी एनडीएमधून पडले. याच कारणामुळे बिहारमध्ये फायदा व्हावा यासाठी भाजपा पक्ष चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सामील करण्यास उत्सुक होता.

Story img Loader