केरळच्या दक्षिणेकडील किनारपट्टी भागातील तिरूवनंतपूरम येथील अदानी समुहाच्या विझिंजम इंटरनॅशनल सीपोर्ट लिमिटेडच्या प्रवेशद्वारासमोर अदानी बंदर प्रकल्पाविरोधात मच्छिमारांचे आंदोलन आठवड्यानंतरही सुरूच आहे. आळीपाळीने २४x७ आंदोलनकर्ते तंबूमधून लॅटिन कॅथॉलिक चर्चचे लाल-पिवळे-पांढरे झेंडे फडकवत आहेत.  

हे आंदोलनकर्ते प्रामुख्याने मच्छिमार समुदायाचे असून किनार पट्टीला लागून असलेल्या गांवांमधील आहेत, रू. ७,५०० कोटींच्या खोल समुद्रातील बंदर प्रकल्पाची त्यांना भीती असून तो तिरूवनंतपूरम येथील विझिंजममध्ये उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे समुद्राची धूप होऊन त्यामुळे पारंपरिक रोजगाराला फटका बसण्याची भीती आहे. राज्यातील सर्व मुख्य राजकीय पक्ष द्विधा स्थितीत असून काहींचा अदानी यांच्या विझिंजम प्रकल्पाला पाठिंबा आहे तर काहींचा मच्छिमारांच्या वोट बँकेवर डोळा असल्याचे स्पष्ट होते. लॅटिन कॅथॉलिक चर्चने आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

कॉग्रेस नेते व्ही डी सतिशन यांनी मागच्या आठवड्यात आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिली असता त्यांचे प्रकल्पाविषयी भूमिकेबद्दल प्रश्नांच्या सरबत्तीने स्वागत करण्यात आले. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांबद्दल मच्छिमारांच्या  मनातील असंतोष यावेळी प्रकर्षाने जाणवला.
हे आंदोलन अदाणी प्रकल्पाविरुद्ध आहे, सुयोग्य पुनर्वसन योजना राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. किनारपट्टीतील समुदायाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. तथापि, अलीकडील अनेक मुद्द्यांवर एलडीएफ सरकारच्या विरोधात काँग्रेसने कठोर भूमिका घेतली असूनही, अदानी समुहासोबत करारावर स्वाक्षरी करणारे त्यांचेच सरकार असल्याने विझिंजम निदर्शनांवर सरकारला घेरण्यात काँग्रेस असमर्थ ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किनारपट्टी भागातील लोकांवर चर्चच्या प्रभावाचा संदर्भ देताना, राजकीय तज्ज्ञ आणि केरळ सेंट्रल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ जी गोपाकुमार म्हणाले, “येथील मच्छिमारांच्या जीवनात चर्चने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तीन दशकांपूर्वी, जेव्हा मी विझिंजम किनारपट्टीला भेट दिली तेव्हा मला समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांसाठी एक सूचना फलक दिसला. सरकारने नव्हे तर स्थानिक बिशपने आपले म्हणणे मांडले होते. राजकीय व्यवस्था मच्छिमारांचे म्हणणे लक्षात घेणारी नाही किंवा संवाद घडवून आणणारी दिसत नसल्याने आता चर्चची भूमिका अधिक विस्तृत झाली आहे. राजकीय पक्षांनी मच्छिमारांना संघटित करण्याचे काम चर्चवर सोपवण्याऐवजी स्वत: हाती घ्यायला हवे होते,’’ असे ते म्हणाले.