बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथील महायुतीच्या घटकपक्षांत सध्या नाराजी असल्याचे
म्हटले जात असून नितीश कुमार यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा भाजपकडून केला जात आहे. दरम्यान, येथील पावसाळी अधिवेशनाच्या एका दिवसाआधी नितीश कुमार आणि राजद पक्षाचे आमदार सुनील सिंह यांच्यात बैठकीदम्यान खडाजंगी झाली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटकपक्षांच्या आमदारांची
बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व पक्षांचे आमदार तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान नितीश कुमार यांनी सुनील सिंह यांना तुम्हाला भाजपमध्ये जायचे आहे का? लोकसभेची निवडणूक लढवायची आहे का? असा प्रश्न केला. या प्रश्नामुळे सुनील
सिंह नितीश कुमार यांच्यावर भडकले. हा वाद वाढू नये म्हणून तेजस्वी यादव यांना हस्तक्षेप करावा लागला.

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

नितीश कुमार यांनी सुनील सिंह यांना लक्ष्य का केले?

सुनील सिंह यांनी नुकतेच केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. १ जुलै रोजी पार पडलेल्या केंद्रीय सहकार काँग्रेसमध्ये ही भेट झाली. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी सुनील सिंह यांना लक्ष्य केले. नितीश कुमार यांच्या विधानानंतर सुनील सिंह यांनी, मी कार्यालयीन कामासाठी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो; माझ्या तसेच
आमच्या राजद पक्षाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नयेत, असे नाराजीच्या सुरात सांगितले. त्यानंतर वाद वाढण्याची शक्यता असल्यामुळे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

“तुम्हाला भाजपमध्ये जायचे आहे का?”

या बैठकीत महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे आमदार उपस्थित होते. मात्र, नितीश कुमार यांनी फक्त सुनील सिंह यांना लक्ष्य केले. मागील काही दिवसांपासून सुनील सिंह महायुती तसेच अन्य नेत्यांवर टीकात्मक भाष्य करत आहेत. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी त्यांना लक्ष्य केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत बैठकीला उपस्थित असलेल्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. “सुनील सिंह यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची मला कल्पना आहे, असे बैठकीत नितीश कुमार यांनी सांगितले. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचे आहे का? भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे का? असे म्हणत नितीश कुमार यांनी सिंह यांना डिवचण्याचा प्रयत्न केला,” असे या आमदाराने सांगितले.

खुर्चीवरून उभे राहत तेजस्वी यादव यांच्याकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न

नितीश कुमार तसेच सुनील सिंह यांच्या या वादात सुनील सिंह चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी खुर्चीवरून उठत थेट नितीश कुमार यांना प्रत्युत्तर दिले. तसेच अमित शाह हे सहकारमंत्री आहेत. मी बिहार सहकारी बाजार समितीचा प्रमुख आहे. याच कारणामुळे मी त्यांची भेट घेतली, असे स्पष्टीकरणही दिले. हा वाद वाढण्याची शक्यता असल्यामुळे तेजस्वी यादव यांनी खुर्चीवरून उठत सिंह यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

अनेक नेत्यांवर सुनील सिंह यांनी केली आहे टीका

मागील काही दिवसांपासून सुनील सिंह हे जदयू पक्षांच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी शिक्षणमंत्री चंद्रशेखर तसेच शिक्षण विभागाचे मुख्य सचिव के. के. पाठक यांच्यातील वादावर भाष्य केले होते. मंत्र्यांना नियंत्रणात
ठेवण्यासाठी नितीश कुमार यांनी निवडक चार ते पाच शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरलेले आहे, असे सिंह म्हणाले होते. तसेच त्यांनी जदयू पक्षाचे नेते अशोक कुमार यांच्यावरही सातत्याने पक्ष बदलत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर बोलताना अशोक कुमार यांनी मी सुनील सिंह यांना ओळखत नाही, असे म्हणत त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला होता.

जदयू-राजद पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद?

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजद आणि जदयू पक्षाच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या घटना घडल्या आहेत. याच कारणामुळे सध्या महायुतीमध्ये नाराजी असल्याचा दावा केला जात आहे.