दयानंद लिपारे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा गडकोट प्रेमींच्या पातळीवर रेटला जात असताना अलीकडे त्यावरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, आमदार विनय कोरे आणि ठाकरे शिवसेना यांच्या परस्परविरोधी भूमिका आणि कुरघोड्या सुरु झाल्याने विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा राजकीय पटलावर तापत चालला आहे.
प्रतापगडावरील अफझलखानच्या कबरेच्या सभोवतालचे अतिक्रमण हटवण्यात आले. यानंतर राज्यभरातील किल्ले, गडावरील अतिक्रमणे हटवली जावीत यासाठी गडकोट प्रेमी, हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवायला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील अतिक्रमण मुद्दाही चर्चेत आला. या गडावरील अतिक्रमणे हटवली जावीत यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. नंतर यामध्ये शिवसेना इतर घटकही सहभागी होत गेले. या सर्वांच्या रेट्यामुळे विशाळगडच्या पायथ्याजवळचे अतिक्रमण काढले आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी डिसेंबर महिन्यात विशाळगडला भेट देऊन अतिक्रमणे हटवली नाहीत तर हा प्रश्न मला हाताळावा लागेल, असे बजावले होते. तर, विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हातात कुदळ, फावडे घेऊन निघालेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांना पोलिसांनी रोखले होते.
हेही वाचा…म्हैसाळ सौरउर्जा प्रकल्पातून सांगलीत खासदारांची मतपेरणी
आमदार कोरे यांच्यावर निशाणा
या पातळीवर राजकीय घडामोडी घडत असताना गेल्या आठवड्यात शाहूवाडी -पन्हाळा तालुक्याचे जन सुराज्यशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचा प्रवेश झाला. त्यामुळे वाद रंगत चालला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विशाळगड येथील काही नागरिक, संघटना यांची बैठक विनय कोरे यांच्या पुढाकारातून झाल्याचे काही गडप्रेमींच्या लक्षात आले. अतिक्रम हटवण्याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन बैठक आयोजित केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना स्थानिक आमदारांनी गुपचूप प्रशासकीय बैठक घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या बैठकीवरून संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार कोरे यांना टीकेचे लक्ष्य केले. ‘ आमदारांनी शे – पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणि पाठीशी घातल्याने विशाळगडची विषण्ण अवस्था झाली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या कारवाईबाबत दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमची मतांची गोळा बेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही ,’ अशा शब्दात त्यांनी आमदार कोरे यांच्यावर निशाणा साधला. दुर्गप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रोष व्यक्त केल्याने ती रद्द करावी लागली.
हेही वाचा… कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापची अस्तित्वाची लढाई
संभाजीराजेंवर नाराजी
संभाजी राजे छत्रपती यांनी टीका केल्याने आमदार कोरे यांना त्यांना उत्तर देणे भाग पडले. ‘ संभाजीराजेंना चुकीची माहिती दिली असावी. इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तींनी अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करणे योग्य वाटत नाही. विशाळगडच्या अतिक्रमणला चालना देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले नव्हते तर समन्वय साधण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने ती रद्द केली. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. अशा पद्धतीने पोस्ट करणे आणि यावर चर्चा करणे कसे काय घडले हे मला कळत नाही, ‘ असे म्हणत कोरे यांनी संभाजीराजेंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा… परभणी जिल्ह्यात अजूनही चाचपडतेय ‘बाळासाहेबांची शिवसेना’
अतिक्रमण कार्यवाही कितपत गांभीर्याने?
संभाजी राजे छत्रपती आणि विनय कोरे यांच्यात शाब्दिक असताना शिवसेनेने उभयतांनी एकमेकांवर आरोप करून लुटूपुटुची लढाई करण्यापेक्षा किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. पुरातत्त्व खात्याने अतिक्रमण पाडण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असताना जिल्हाधिकारी अतिक्रमण काढण्यासाठी महाशिवरात्रीची वाट का पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे गट शिवसेनेने जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी कार सेवा आंदोलन करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. यातून राज्यशासनाची, गृह विभागाची कोंडी होऊ शकते. दरम्यान, विशाळगडावर छत्रपती अहिल्याबाई यांच्या समाधी जवळ कोंबडे कापण्यासाठी नवीन शेड उभारण्यात येत होती. हा प्रकार पाहून शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी हर्षल सुर्वे यांनी काम बंद करण्यास सांगितले. याबाबतची छायाचित्रे, व्हिडिओ त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत. तहसीलदारांनी काम बंद करण्याची ताकीद दिली आहे. या घटनेवरून अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही कितपत गांभीर्याने केली जात आहे, असा प्रश्नही या उपस्थित झाला आहे.