मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. कित्येक दिवसांपासून नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि तेथील हत्याकांडावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. याच कारणामुळे देशभरातून भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोदी यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले. याच कारणामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी राजस्थानचा अपमान करू नये, असे गहलोत म्हणाले आहेत.

“देशातील १४० कोटी लोकांना लाज वाटत आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील घटनेवर बोलताना राजस्थान व छत्तीसगड येथील महिला अत्याचारांचा उल्लेख केला. हाच मुद्दा घेऊन अशोक गहलोत यांनी मोदी यांच्यावर टीका केली. “राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. “हा राजस्थानच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. पंतप्रधान म्हणाले की, सध्या घडत असलेल्या घटनांमुळे देशातील १४० कोटी लोकांना लाज वाटत आहे. मात्र, प्रत्यक्षात मोदी यांच्या सरकारचे अपयश, दुर्लक्ष यामुळे देशातील जनता दु:खी आहे,” असे गहलोत यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

“७७ दिवसांनंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया”

गहलोत यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना “मणिपूरमधील हिंसाचारास साधारण ७७ दिवस उलटल्यानंतर मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. तोपर्यंत मोदी मणिपूरवर काहीही बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपाची भूमिका घेतल्यानंतर मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया त्यांनी काही सेकंदांत संपवली. मणिपूरमधील हिंसाचारात कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे,” अशी भावना गहलोत यांनी व्यक्त केली.

“मोदी यांनी मणिपूरला भेट द्यायला हवी होती”

नरेंद्र मोदी यांनी अद्याप मणिपूरला का भेट दिली नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. “नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट द्यायला हवी होती. मणिपूरमध्ये जाणे शक्य नव्हते, तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयात बैठक घेऊन हा हिंसाचार कसा रोखता येईल, याचे नियोजन करायला हवे होते. मात्र ज्या राज्यांत निवडणूक होणार आहे, त्या राज्यांना मोदी भेट देत आहेत,” अशी टीका गहलोत यांनी केली.

“मणिपूरमध्ये काँग्रेसचे सरकार असते, तर काय केले असते?”

पंतप्रधानपदाला एक पावित्र्य आहे. मणिपूरमध्ये भाजपाचेच सरकार आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसचे सरकार असते, तर भाजपाने आतापर्यंत काय केले असते, याची कल्पनाच करायला हवी, असेही गहलोत म्हणाले. राजस्थानच्या विधानसभेत गहलोत यांच्याच सरकारमधील मंत्री राजेंद्र गूढा यांनी राजस्थानमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचारांवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर काही तासांत त्यांना पदावरून हटवण्यात आले. याबाबत विचारले असता, हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही या प्रकरणावर पक्षामध्ये चर्चा करू, असेही गहलोत म्हणाले.

“हा तर संघ परिवाराचा अजेंडा”

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील मोदी यांच्यावर टीका केली. मणिपूरमध्ये दंगली घडवून आणण्याचा संघ परिवाराचा अजेंडा आहे, असा आरोप विजयन यांनी केला. मणिपूरविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विजयन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. “मणिपूरमध्ये दंगलीच्या आडून ख्रिश्चन धर्मीयांना लक्ष्य केले जात आहे. आदिवासी असलेल्या ख्रिश्चन धर्मीयांच्या चर्चची नासधूस केली जात आहे. आपल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी समाजाने यामागचा संघ परिवाराचा अजेंडा ओळखला पाहिजे. संघ परिवाराने मणिपूरला दंगलीच्या क्षेत्रात बदलले आहे,” असा आरोप विजयन यांनी केला.

मणिपूरमधून अतिशय भयावह फोटोज येत आहेत. ज्या लोकांवर तेथे शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आहे, तेच आगीत तेल ओतत आहेत. ज्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांनी धुव्रीकरणाच्या प्रयत्नांना हाणून पाडले पाहिजे, असे आवाहनही विजयन यांनी केले.