ठाणे लोकसभेचा महत्वाचा भाग असलेल्या मीरा-भाईंदर शहरांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्ताबदलानंतर लक्ष केंद्रीत केल्याने या भागातील भाजप नेते कमालीचे सावध झाले आहेत. जैन, गुजराती समाजाचा मोठा भरणा असलेली ही शहरे अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनली आहेत. राज्यात युतीचे सरकार असताना येथील महापालिका निवडणुकीत भाजप आणि पुर्वीची एकसंघ शिवसेना एकमेकांविरोधात लढले. शिवसेनेचे या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ही शहरे जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र ऐनवेळेस येथील ठराविक समाजातील साधूंनी केलेल्या आवाहनाचा मोठा फटका शिवसेनेला बसला. तेव्हापासून या शहरांवर एकहाती वरचष्मा मिळविण्यासाठी आमदार सरनाईक प्रयत्नशील आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही या शहरांवर लक्ष केंद्रीत केले असून विद्यमान आमदार गीता जैन आणि सरनाईक या दोघांनाही भरभरुन निधी दिला जात आहे. या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून मीरा-भाईंदरवर आपल्या पक्षाची पकड कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची रणनिती भाजपच्या स्थानिक नेत्यांना मात्र अस्वस्थ करु लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : जालन्यात शरद पवार की अजित पवार कोणत्या गटाचे वर्चस्व ?

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील दोन्ही मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आहे. प्रताप सरनाईक आणि गीता जैन या दोन्ही आमदारांना भरघोस निधी मंजूर केला जात आहे. गीता जैन या भाजपच्या बंडखोर आमदार. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या बाजूने वळविले. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जैन या भाजपच्या व्यासपिठावर तसेच वेगवेगळ्या बैठकांना दिसू लागल्या आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीत त्या नेमक्या कोणाच्या बाजूने असतील याविषयी अजूनही स्पष्टता नाही. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभारत किमान एक डझन वेळा शहरात विविध कार्यक्रमानिमित्ताने भेटी दिल्या आहेत. शहरात पक्ष वाढविण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी काढलेल्या कंटेनर शाखांना मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहेच. या सगळ्या घडामोडींमुळे आपल्याच बालेकिल्ल्यात भाजप संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : बंगालचे नवे पोलिस महासंचालक राजीव कुमार कोण आहेत? ज्यांच्यासाठी ममता बॅनर्जींनी केले होते आंदोलन!

ठाणे लोकसभेवर मुख्यमंत्र्यांची पकड ?

मीरा भाईंदर शहराचा समावेश हा ठाणे जिल्ह्यात येतो. भाईंदर मतदार संघांचे नेतृत्व भाजप उमेदवाराला पराभूत करून अपक्ष निवडणुन आलेल्या आमदार गीता जैन करत आहेत. तर ओवळा – माजीवडा मतदार संघ हा मागील तीन निवडणुकीपासून शिवसेनेच्या (आता शिंदे गट ) प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात आहे. २०२० मध्ये एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकार काळात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर प्रामुख्याने या शहराकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची येथील पालिकेत नेमणूक करून त्यांनी येथील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. भविष्यात आपले राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ते ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरावर बारकाईने लक्ष देत आहेत. त्यादृष्टीने मीरा भाईंदर मधील दोन मतदारसंघावर विशेष लक्ष दिले आहे. शिंदेच्या मध्यस्तीनंतर आमदार गीता जैन यांनी देखील उद्धव ठाकरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेऊन तो भाजपला दिला. दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील शिंदे गटाच्या समर्थनासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.

हेही वाचा : भाजपची मतपेटी वळविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न, उत्तर भारतीय आणि जैन समाजाच्या मेळाव्यांना उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

दोन्ही आमदारांच्या माध्यमातून शहरावर पकड

भविष्यात आपला राजकीय दबदबा कायम ठेण्यासाठी शहरातील दोन्ही आमदार आपल्याकडेच राहावेत यासाठी शिंदे हे अधिक प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी अवघ्या दीड वर्षात त्यांनी मीरा भाईंदर शहराला या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून विकासासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.याशिवाय मागील दीड वर्षात डझनभराहुन अधिक वेळा लहान-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावली. महत्वाची बाब म्हणजे शहरात केवळ विधानसभा क्षेत्रावर हा दावा मजबूत न ठेवता आगमी पालिका निवडणुकीच्या दुष्टीने पक्षाची ताकद वाढवण्याकडे शिंदे यांनी लक्ष दिले आहे.यासाठी शहरातील विविध प्रभागात पदपथावर तसेच मोकळ्या जागेवर कंटेनर स्वरूपात पक्षाच्या शाखा उभारून नागरिकांना जोडण्याचे काम हाती घेतले आहे. प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तोडीचा एकही उमेदवार नाही. गीता जैन यांच्या मतदार संघात भाजपाच्या उमेदवाराने दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैन यांना आपल्याकडे ठेवून या जागेवर देखील दावा करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरावरील विशेष प्रेम आणि आपला पक्ष वाढविण्याच्या खेळीमुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे.

हेही वाचा : शिवसेना लढणाऱ्या मतदारसंघांमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा, अजितदादांचा दावा असलेल्या शिरुरमध्येही सभा

दोन्ही आमदारांची सावध भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा भाईंदर काबिज करण्यासाठी प्रयत्नशील असताना दोन्ही आमदारांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेना भाजप युतीचे घटक आहोत. जागावाटपाबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे त्यांनी सांगितले. मात्र यापूर्वी येथील दोन्ही विधानसभा क्षेत्रात समान असलेल्या लोकसभेच्या जागेचे नेतृत्व शिवसेनेच्या उमेदवारांनी केले होते. त्यामुळे ती जागा आम्हालाच मिळाली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी बाबत युती सरकार मधील वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील. ते ज्या व्यक्तीची निवड करतील त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार गीता जैन यांनी दिली आहे.