अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या सद्यास्थितीचा तसेच खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. मात्र, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा झाकोळला गेला. रायगड जिल्ह्यातील रस्त्याची पाहणी करूनच या दौऱ्याची सांगता करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरले होते. पळस्पे पासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरवात केली, गडब, वाकण, कोलाड, माणगाव येथे त्यांनी भर पावसात उतरून रस्त्याच्या कामांची पाहणी केली. यानंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सांगता करण्यात आली.
हेही वाचा : ‘राज्य वक्फ बोर्डा’ने सुधारणा विधेयकाला विरोध करावा!
मुख्यमंत्र्याची पाहणी दौरा सुरू असतानाच मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदला मार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांचा पुतळा कोसळल्याची बातमी आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. माध्यमांचा सर्व फोकस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांकडून पुतळा दुर्घटनेकडे वळला गेला.
© The Indian Express (P) Ltd