ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात उद्धव ठाकरे यांच्याशी दोनहात करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज यांनाच मुंबईसोबत ठाणे, कल्याणच्या मैदानात उतरविण्याची रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गोटात आखली जात असताना ठाण्यात नरेश म्हस्के आणि कल्याणात डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पहिल्या दिवसापासून मनसेची रसद उपलब्ध व्हावी यासाठी शिंदेसेनेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजीवडा तसेच नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दीड लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील राजकीय गणिते वेगळी असली तरी राज ठाकरे यांना मानणारी लाखभर मतांची बेगमी करण्यासाठी म्हस्के यांच्याकडून आतापासूनच भारतीय विद्यार्थी सेनेत राज यांच्यासोबत केलेल्या कामांच्या आठवणींना पद्धतशीरपणे उजाळा दिला जात आहे. कल्याणातही आमदार राजू पाटील यांना प्रचारात सक्रिय करत आगरी मतांची एकगठ्ठा बांधणी करण्याची गणिते आखली जात आहेत.

शिवसेनेत युवा सेना नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचा दबदबा होता. मुंबई, ठाण्यातील महाविद्यालयीन विश्वातील अनेक तरुण शिवसेनेच्या या भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडले गेले होते. ठाण्यातील शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासोबत कार्यरत असलेले म्हस्के यांची राज यांच्याशी जवळीक होती. शिवसेनेत उद्धव युगाचा प्रारंभ झाल्यानंतरही काही काळ म्हस्के हे राज यांच्या जवळ होते. राज यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा म्हस्के त्यांच्यासोबत जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र सत्तेच्या गणिताचा अंदाज बांधण्यात पटाईत असणारे म्हस्के तेव्हा शिवसेनेत राहीले. याच काळात नारायण राणे यांनीही शिवसेनेशी बंड केले. काॅग्रेस सरकारच्या काळात राणे मुख्यमंत्री होतील अशी हवा होती. तेव्हा राणे यांच्यासोबत म्हस्के जातील अशी चर्चा काही काळ रंगली. तेव्हाही ठाण्यातील राजकीय हवा म्हस्के यांनी अचूक हेरली. अडीच वर्षापुर्वी झालेल्या शिवसेनेच्या बंडात पहिल्या दिवसापासून म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहीले. त्याचे फळ खासदार निवडणुकीच्या उमेदवारीच्या माध्यमातून त्यांना मिळालेले दिसते.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हेही वाचा : संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा प्रचार सभांमध्ये केंद्रस्थानी, दावे-प्रतिदावे नेमके काय?

राज यांना मदतीसाठी साकडे

ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचे आश्वासन पदरात पाडून घेण्यात शिंदे-म्हस्के यशस्वी ठरले. कल्याणात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे. राजू पाटील आणि भाजपचे स्थानिक मंत्री रविंद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसे सख्य नाही. राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारात दिसू लागले आहेत. ठाण्यात अविनाश जाधव यांच्या बाबतही नेमकी तीच परिस्थितीत आहे. जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी शिंदेसेनेत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. शिंदेसेना आणि जाधव यांच्यात अजिबात सख्य नाही. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून ७२ हजार मते मिळवली होती. त्यावेळी जाधव यांना काॅग्रेस, राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती. ओवळा माजीवड्यात मनसेच्या उमेदवाराने २१ हजार, कोपरी पाचपाखाडीत २१ हजार, ऐरोलीत २२ हजार तर बेलापूर मतदारसंघात २८ हजार मते मिळवली होती. राज यांना मानणारी किमान लाखभर मते तरी या मतदारसंघात आहेत अशी गणिते महायुतीने बांधली आहेत. त्यामुळे ठाणे आणि कल्याणात राज यांच्या सभा घेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून केला जाण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : मराठवाड्यात मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

राज माझे राजकीय गुरुच : म्हस्के

२०१२ सालात झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि नरेश म्हस्के यांची जवळीक दिसून आली होती. या निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा आनंद नगर परिसरातून जात असताना तिथे नरेश म्हस्के उभे होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी वाहन थांबवून नरेश म्हस्के यांची विचारपूस केली होती आणि म्हस्के यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले होते. यावेळी ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच, म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ही भेट घेत असताना ‘राजकारणाची बाराखडी गिरवताना ज्यांनी हात धरून शिकवले, कार्यकर्ता म्हणून घडवले अशा राज ठाकरे ह्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला आणि त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी विजयाचा विश्वास मिळाला’. अशी भावना त्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.