ठाणे : कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या नेत्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिरवणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसाठी महायुतीचे नेते, कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र दिसून आले.

ठाणे येथील कोपरी-पाचपखाडी हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत होणार आहे. शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी टेंभीनाका येथील आनंदाश्रमात जाऊन गुरुस्थानी असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते मिरवणुकीत सामील झाले. या मिरवणुकीत सामील होण्यासाठी सकाळपासूनच ठाणे जिल्हा आणि मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वागळे इस्टेट भागात जमण्यास सुरुवात झाली.

Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
marathwada assembly elections
‘कमळा’ची लढत ‘मशाल’ टाळून, मराठवाड्यात भाजपला ठाकरे गटाचे आव्हान कमी; दोनच जागांचा अपवाद
mahayuti
चावडी: राणे, भुजबळ, गणेश नाईक यांची ‘दादागिरी’
supriya sule
लेकी, नाती १५०० रुपयांत विकत घेता येत नाहीत- सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा : चावडी: राणे, भुजबळ, गणेश नाईक यांची ‘दादागिरी’

u

शिवसैनिकांबरोबरच भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि रिपाइंचे (आठवले गट) कार्यकर्ते पक्षाचे झेंडे हातात घेऊन मिरवणुकीत सामील झाले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेतेही मिरवणुकीत सामील झाले होते. या मिरवणुकीमुळे वागळे इस्टेट भागातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वागळे इस्टेटमधील रस्त्यांवर मिरवणूक जात असताना, रस्त्यालगतच्या इमारतींमधून नागरिक शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते. या मिरणुकीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मशाल महाराष्ट्राला आग लावणारी- मुख्यमंत्री

मशाल ही क्रांतीची नाही तर महाराष्ट्राला आग लावणारी आहे. जाती-जातीमध्ये आग लावणारी आहे. या मशालीला लोकसभेमध्ये त्यांची जागा दाखवली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. तसेच धनुष्यबाण आणि मला कोणीही हलक्यात घेऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी मिरवणूक काढली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केला. कोणी कितीही काही बोलू देत, ते लोक त्यांच्या पायात- पाय घालून खाली पडणार आहेत. आम्ही चौकार, षटकार मारणार असे ते म्हणत आहेत. परंतु निवडणुकीचा हा सामना महायुतीच जिंकणार असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही आरोपांना आरोपांनी नाही तर कामाने उत्तर दिले आहे. त्यामुळे हे सरकार आता सर्वांचे लाडके सरकार झाले आहे. लाडक्या भाऊ आणि बहिणींनी ही निवडणूक हातात घेतली आहे. येथील मतदारांनी मला निवडून दिले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. यावेळी या ठिकाणाहून मला विक्रमी मताधिक्य मिळणार आहे. महाविकास आघाडीने सर्व प्रकल्प बंद केले होते. परंतु आमच्या सरकारने ते पुन्हा सुरू केले. दोन वर्षांत आम्ही विविध कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : लेकी, नाती १५०० रुपयांत विकत घेता येत नाहीत- सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ

● एकूण संपत्ती- ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५०

(२०१९ मध्ये- १३ कोटी ६६ लाख ७४ हजार ९३२)

● जंगम- ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५०

● स्थावर- २८ कोटी ४६ लाख ८० हजार

● शिक्षण – एमए

● गुन्हे – ०९

यंदाही ठाणे महायुतीचे फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ठाणे शहर हे भगवे होते, आहे आणि या पुढेही कायम राहील. या शहरातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. त्यामुळे यंदाही ठाणे हे महायुतीचे असेल असा दावा त्यांनी केला. आम्ही प्रत्येक निवडणुकीकडे आव्हान म्हणून बघत असतो. परंतु पुन्हा एकदा सत्ता आम्हाला देण्याचे जनतेनी मनात ठरविले आहे. मुंबईतही महायुतीची ताकद आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ताकदीने आणि जिंकण्यासाठी लढत आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : जागावाटपावर बोलण्याऐवजी विरोधकांवर तोफ डागा – पटोले

अजित पवार बारामतीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे महायुतीचे नेते उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नव्हते. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामती येथे मिरवणूक काढली होती. त्यामुळे ते ठाण्यात हजर राहू शकले नसल्याचे समजते.

Story img Loader