ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, सोमवारी कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेकडून (शिंदे गट) मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा ; Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?

u

प्रमुख उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे निवडणूक लढवीत आहेत. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. तेदेखील सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर हे अर्ज दाखल करणार आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला तर ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे संदीप पाचंगे उमेदवारी अर्ज दाखल करतील.